Live : देशदूत संवाद कट्टा : पतंग महोत्सवातील धातूयुक्त मांजाचा पशुपक्षी, मानवाला होणारा त्रास

नात्यांची ऊब जपणारा सण म्हणजे संक्रांत ! या सणाचा उत्साह सर्वत्र मोठ्या प्रमाणात बघायला मिळाला. युवक-युवती, तरुण-तरुणी आणि लहानगे जीवावर बेतून पंतगोत्सव साजरा करतात. परंतु पतंगासाठी वापरला जाणारा मांजा हा निसर्ग आणि त्याच्या कुशीत खेळणाऱ्या पक्षांच्या जीवावर बेतू लागला आहे. गेल्या काही वर्षांपासून हे प्रमाण अधिकच वाढले आहे.

मकर संक्रांतीच्या काळात होणारी पतंगबाजी आणि धारदार मांज्यामुळे पक्ष्यांना होणारी दुखापत व मृत्यू या घटनांचा विचार करून शासनाने यावर्षी नायलॉन (धारदार) मांज्यावर बंदी घातली. या निर्णयाचा पक्षीमित्रांनी स्वागतही केले मात्र आकाशात भरारी घेणाऱ्या पतंगांसाठी मांजा वापरण्यावर अंकुश लागला नसल्याने पतंगोत्सवात अनेक पक्षांवर ‘संक्रांत’ आली.

आज दि. १७ जानेवारी २०२० रोजी ‘देशदूत संवाद कट्टा’ कार्यक्रमात ‘पतंग महोत्सवातील धातूयुक्त मांजाचा पशुपक्षी, मानवाला होणारा त्रास’ या विषयावर चर्चा करण्यासाठी आले आहेत राजेंद्र गाडगीळ व सौ.शिल्पा गाडगीळ…

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com