Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedदेशदूत विशेष : नमामी गोदा फाऊंडेशनची ओळख

देशदूत विशेष : नमामी गोदा फाऊंडेशनची ओळख

नाशिक | Nashik

दैनिक देशदूतच्या वतीने आजपासून दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी ‘आम्ही’ या लाईव्ह चर्चेत वेगवेगळ्या सामाजिक संस्थांची वाटचाल याठिकाणी उलगडली जाणार आहे. नमामी गोदा फाऊंडेशन ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून गोदावरी नदी पुनर्जीवित करण्यासाठी कार्यरत आहे. Nashik namami goda foundation

- Advertisement -

नदीत सोडले जाणारे गटारीचे पाणी या संस्थेने रोखली. यासाठी मोठा लढाच या संस्थेने उभारला आहे. असंख्य नाशिककरांची साथ यांना मिळाली आहे. आज नाशिक शहरासह परिसरात गटारीचे पाणी शुद्ध करून नदीत सोडले जात आहे. मागे फिरून बघताना हा प्रवास किती खडतर आणि संघर्षाचा होता याबाबत लाईव्ह चर्चेत संस्थापक राजेश पंडित यांनी वेगवेगळे दाखले देत मांडले.

Godavari River

यापुढेही हे कार्य असेच सुरु राहणार आहे, नाशिककरांना सोबत घेऊन गोदामाई १०० टक्के शुद्ध करून वर्षातील ३६५ दिवस कशी वाहती राहील यावर सध्या या संस्थेसह सहकारी संस्था काम करत आहेत. आगामी वेगवेगळे काय प्रकल्प हाती घेतले जातील याबाबतची माहिती अभिनेता किरण भालेराव यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या