Thursday, April 25, 2024
HomeनाशिकVideo : मांजरपाड्याचा बोगदा आहे तरी कसा? 'पाहा' देशदूतचा खास ग्राऊंड रिपोर्ट

Video : मांजरपाड्याचा बोगदा आहे तरी कसा? ‘पाहा’ देशदूतचा खास ग्राऊंड रिपोर्ट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मांजरपाडा प्रकल्प हा गुजरातला वाहून जाणारे पाणी वळविणारा राज्यातील पहिला प्रकल्प आहे. पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी अडवून ते वळण योजनांद्वारे पूर्ववाहिनी गोदावरी खोऱ्यामध्ये वळविण्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळांच्या प्रयत्नांमुळे जलसंपदा विभागाने २४ नोव्हेंबर २००६ ला मांजरपाडा योजनेला मंजुरी दिली…

- Advertisement -

ही योजना मंजूर झाल्यानंतर २०१९ साली म्हणजेच तब्बल १३ वर्षांनी हा प्रकल्प पूर्ण झाला. दुष्काळाग्रस्त येवला व चांदवडसह दिंडोरी तालुक्‍यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी या प्रकल्पामुळे जलसंजीवनीच मिळाली आहे.

पश्चिमवाहिनी-पूर्ववाहिनी खोरे दुभाजक रेषेच्या पश्चिम बाजूला वाहत जाणारे छोटे छोटे नाले, तीव्र उतार सुरू होण्याआधी छोटे बंधारे बांधून अडविणे, त्यांचा सांडवा पूर्व बाजूला काढून सांडव्यावरून वाहून जाणारे पाणी कालव्याद्वारे पूर्व बाजूला गोदावरी खोऱ्यात वळविणे असे या प्रकल्पाचे स्वरूप आहे.

मांजरपाडा वळण योजनेअंतर्गत देवसाने गावाच्या खालील बाजूस पाणी अडवून बोगद्याद्वारे प्रवाही पद्धतीने गोदावरी खोऱ्यातील पुणेगाव धरणाच्या वरील बाजूस उनंदा नदीत सोडण्यात आले आहे.

या प्रकल्पामधील मांजरपाडा धरणाची एकूण लांबी ३४५० मीटर इतकी असून, समुद्र सपाटीपासून धरणमाथा पातळी ७२२ मीटर व पूर्णसंचय पातळी ७१८ मीटर आहे. धरणाच्या एकूण लांबीत एकूण १२ नाले अडविण्यात आले आहे. हे पाणी १.२० कि.मी. लांबीचा जोड बोगदा व ८.९६० कि.मी. लांबीचा वळण बोगदा, असे एकूण १०.१६ किलोमीटर लांबीच्या बोगद्याद्वारे पुढे उनंदा नदीतील ३.२० कि.मी. लांबीच्या उघड्या चऱ्यांद्वारे मौजे हस्ते या गावाजवळ उनंदा नदीत सोडण्यात येत आहे. ते पुढे गोदावरी खोऱ्यातील पुणेगाव धरणाद्वारे चांदवड व येवला तालुक्यांत वितरित होत आहे.

असा आहे मांजरपाडा प्रकल्प

बोगद्याची लांबी : १०.१६ किलोमीटर

पार नदीवरील बंधाऱ्याची क्षमता : २६७ दशलक्ष घनफूट

मांजरपाडा प्रकल्पाची क्षमता : ६१० दशलक्ष घनफूट

बोगद्याची वहनक्षमता : २४३ क्युसेक

बोगद्यातून वळणारे पाणी : पार नदीसह १२ नाले

- Advertisment -

ताज्या बातम्या