Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयमला वाटेल तेव्हा मी बोलेन - अजित पवार

मला वाटेल तेव्हा मी बोलेन – अजित पवार

पुणे |प्रतिनिधी| Pune

“हे बघा याबाबत मी वारंवार बोललो आहे आणि तरीही तुम्ही तेच तेच उगाळत बसले आहात. त्याबद्दल मी अगदी स्पष्टपणे याआधीच सांगितलं आहे की मी मला वाटेल तेव्हा मी बोलेन. तो माझा अधिकार आहे”, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी, पहाटेच्या शपथविधीसाठी शरद पवार (Sharad Pawar) यांनीच तुम्हाला पाठवलं होतं? या पत्रकारांच्या प्रश्नावर संतप्त (Angry) होत उत्तर देणं टाळलं.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांच्या पत्राची भाषा अशोभनीय

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या निवडणुकीच्या (Pune District Central Co-operative Bank) संदर्भात मेळाव्याचे आणि आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेच्या संदर्भातील अनेक खुलासे केले. त्यात त्यांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) सकाळच्या शपथविधीवरही भाष्य केले. पहाटेच्या शपथविधीसाठी तुम्हीच अजित पवार यांना पाठवलं होतं असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला असता त्यांनी मी पाठवलं असतं तर सत्ता स्थापन झालं असतं असं म्हणत साऱ्या चर्चा फेटाळून लावल्या. याच मुद्द्याबाबत आज अजित पवार यांना प्रसारमाध्यमांनी विचारलं असता ते चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले.

नव्या वर्षापासून सरकारी कार्यालयांना बॅटरी इलेक्ट्रिक वाहने खरेदी करावी लागणार

“मी याआधीच सांगितल की मला याबद्दल काहीच बोलायचं नाही. ज्यावेळेला मला वाटेल तेव्हा मी बोलेल. तो माझा अधिकार आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सत्ता स्थापनेसाठी ऑफर केली होती, त्यावर ते म्हणाले की मी काहीही बोलणं आणि गैरसमज करणं बरोबर नाही आणि ‘नो कमेंट्स’ असं म्हणत ते थांबले.

…तर राज्यात लॉकडाऊन; गृहमंत्र्यांचा इशारा

विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीप्रकरणी महाविकास आघाडीचे नेते पुन्हा राज्यपालांची भेट घेणार

विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीप्रकरणी महाविकास आघाडीचे नेते पुन्हा राज्यपालांची भेट घेणार आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. बहुमत असतानाही त्यादिवशी निवडणूक घेतलेली नाही. आम्हाला राज्यपालांचा अनादर करायचा नाही, असंही ते म्हणाले.

राज्यपालांनी बदल घटनाबाह्य असं सांगितलं. त्यावर आम्ही टोकाची भूमिका न घेता बहुमत असतानाही त्यादिवशी निवडणूक घेतलेली नाही. आम्हाला राज्यपालांचा अनादर करायचा नाही. आम्ही पुन्हा एकदा राज्यपालांना भेटणार आहोत. त्यांना समजवण्याचा प्रयत्न करु. घटनातज्ज्ञांचाही सल्ला घेऊ. आम्हाला त्यांचा आदर ठेवूनच राज्य चालवायचं आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यास मंजुरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालांना पत्र पाठवण्यात आले होते. पत्रातील भाषेबद्दल राज्यपालांनी पत्राद्वारे तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर अजित पवार म्हणाले, राज्यपाल यांना जे पत्र पाठवण्यात आलं होतं, त्यात घटनात्मक बाबी उपस्थित करण्यात आल्या. बहुमत असताना देखील आम्ही अध्यक्षपदाची निवडणूक आम्ही त्यादिवशी घेतली नाही. आम्हाला ती निवडणूक घेता येत होती. पण आम्हाला राज्यपालांचा अनादर करायचा नव्हता. ते महत्त्वाचं पद आहे आणि त्याचा आदरच केला पाहिजे. आम्ही सर्व प्रमुख नेते भेटून त्यांना समजावून सांगू आणि यात तज्ञांचा देखील सल्ला घेऊ, असे ते म्हणाले.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक न घेऊन महाविकास आघाडी सरकारनं असमजूतदारपणा दाखवून दिला आहे अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे त्यावर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले, २ महिने हातात आहे. २ महिन्यांनंतर अधिवेशन आहे. राज्यपालांनी सांगूनही निवडणूक घेतली असती तर तो आमचा असमजुतदारपणा दिसला असता. मात्र काहींना कळतच नाही की समजूतदारपणा काय आणि असमजुतदारपणा काय असा टोला त्यांनी लगावला.

नितेश राणेंचा जामीन फेटाळला; कोणत्याही क्षणी अटक

निर्बंधांबाबत सरकारला विचार करावा लागेल

मी, आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनीही सांगितलं की कोरोनाचे रुग्ण वाढल्यावर कुठल्याही राज्यात, देशपातळीवर निर्बंध करावेच लागतील कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर कुठल्याही राज्यकर्त्याला निर्बंध कठोर करावेच लागतात. पुणे, मुंबईसह राज्यातील विविध ठिकाणी देखील कोरोनाचे रुग्ण वाढतच आहे. आपल्या घरातील नागरिकांना देखील याची बाधा होत आहे. ओमायक्रॉनचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे. मी तर नेहमीच मास्क वापरण्याबाबत काटेकोरपणे सर्वांत सांगत आलो आहे. मुंबई आणि पुण्यात रुग्णसंख्या झपाट्यानं वाढते आहे. त्यामुळे निर्बंधांबाबत सरकारला विचार करावा लागेल. ओमायक्रॉनची तीव्रता सौम्य असली तरी तो कोरोनाच आहे हे जनतेनं लक्षात घ्यावं. त्यामुळे जास्तीत जास्त काळजी बाळगणं गरजेचं आहे. राजकीय नेत्यांनीही लग्न समारंभांबाबत जरा सामाजिक भान राखून निर्णय घ्यावेत, असं अजित पवार म्हणाले.

लग्नात कोणी बोलवतं. ते आम्हाला सांगताना सर्व नियमांचे पालन केले आहे असं सांगतात गर्दी केलेली नाही अस सांगतात पण तिथे गेल्यावर चित्र वेगळेच दिसते. मग आता आम्हालाच स्वत: ला बंधन घालून घ्यावी लागेल. आम्हालाच घराबाहेर पडता येणार नाही. त्यानंतर मीडियात वेगळ्या बातम्या सुरु होतील की हेच घरात बसून आहेत अशी टिप्पणी त्यांनी केली.

महापालिका निवडणुकीबाबत मध्यप्रदेश पॅटर्न

महापालिका निवडणुकीबाबत आम्ही सभागृहात एकमताने निर्णय घेतला आहे की जोपर्यंत कोरोनाचे संकट दूर होत नाही तोपर्यंत निवडणूका घेण्यात येऊ नये. अशा संदर्भातील निर्णय घेऊन निवडणूक आयोगाला आम्ही सर्वांनी पत्र दिले आहे, असे देखील यावेळी पवार म्हणाले.

लोकांना गांभीर्य नाही…

करोनाच्या गर्दीवरून अजित पवारांनी नागरिकांना सुनावलं. बाबांनो, माझी विनंती आहे, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून लाट येणार आहे. खूप काळजी घेण्याची गरज आहे. अधिवेशनात मला म्हणाले, की मी सभागृहात आल्यापासून ते जाईपर्यंत मास्क लावलेला असतो. बोलताना काढत नाही. आपल्याला नियम पाळावेच लागणार आहे. आपणच नियम पाळत नसू तर लोकांना सांगायचा अधिकार नाही. जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे.

राजकारणात कसा आलो? अजित पवारांनी सांगितला ३० वर्षांपूर्वीचा किस्सा

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या निवडणुकीच्या संदर्भात मेळाव्याचे आणि आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे साहजिकच जिल्हा बँकांचा विषय निघाला आणि त्यावरून अजित पवार यांनी त्यांचा जिल्हा बँकेच्या माध्यमातून राजकारणात कसा प्रवेश झाला याबाबतचा ३० वर्षांपूर्वीचा किस्सा यावेळी सांगितलं. ते म्हणाले, मला आठवतय १९९१ साली त्यावेळी स्वर्गीय सुभाष अण्णा कुल व रमेश थोरात यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते की, तुम्हाला जिल्हा बँकेच्या राजकारणात यायच असेल तर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी अ वर्गातून निवडणूक लढवा. त्यावेळी बारामतीतील जागा कधी आपल्या विचारांची येत नव्हती, तिथे आपले सहकारी काकडे परिवाराचं वर्चस्व होतं, त्यामुळं तिथं निवडणूक लढवायला नाखूष असायचे. पण या दोघांचे म्हणणे मी ऐकले त्यावेळी धाडस दाखवले. लोकांना वैयक्तिक भेटलो. लोकांनी मला निवडणूक दिले अन मी बँकेत गेलो. तेव्हा बँकेच्या ठेवी होत्या 391 कोटी रुपये. आज या गोष्टीला 30 वर्ष झाली. बँकेच्या ठेवी आता 11 हजार कोटीच्या पुढे गेलेल्या असे सांगत महाराष्ट्रातील इतर जिल्हा बँका कश्याप्रकारे रसातळाला गेल्या आहेत यांची माहिती देत कानपिचक्याही काढल्या. जिल्हा बँकांनी जिल्हा परिषदेचे पैसेही बुडवले. शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाहीत. शेतीच्या सुधारणेसाठी आवश्यक असलेल्या सुधारणा होत नाहीत. कारण तिथली परिस्थिती बिकट झाली आहे. कर्मचाऱ्यांचे पगार व्यवस्थित होत नाहीत. अशी टीकाही त्यांनी केली आहे. नागरिकांनी ग्रामस्थांनी विश्वासानं ठेवलेला पैसा, तिथे व्यवस्थित राहायला पाहिजे. यासाठी आम्ही काही नियम केले आहेत, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या