Saturday, April 27, 2024
Homeनाशिकदेवळा तालुक्यातून थेट राजभवनात फोन; 'त्या' बारा विधानपरिषद सदस्यांची निवड करावी

देवळा तालुक्यातून थेट राजभवनात फोन; ‘त्या’ बारा विधानपरिषद सदस्यांची निवड करावी

देवळा | विशेष प्रतिनिधी

राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य नेमणुकीबाबत वाजगाव ता. देवळा येथील गौरव देवरे या तरुणाने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना पत्र पाठवत तसेच राज्यपाल भवनातील दूरध्वनीवर संवाद साधत राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य यांची लवकर नियुक्ती करावी अशी विनंती केली आहे…

- Advertisement -

पोस्ट ग्रेजुएट पुर्ण करुन सध्या स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत असलेल्या या २४ वर्षीय तरुणाने या पत्रात असे नमूद केले आहे की, आपण उत्तराखंडचे मुख्यमंत्री, राज्यसभेचे, लोकसभेचे खासदार यासारख्या पदावर काम केल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

मात्र सदर पत्र लिहिण्यास कारण की, राज्य मंत्रिमंडळाने २० नोव्हेंबर २०२० रोजी आपल्या कार्यालयास विधानपरिषदेत भारतीय राज्यघटनेच्या कलम १७९(५) या अन्वये आपणस प्राप्त अधिकारानुसार नियुक्त करावयाच्या १२ सदस्यांची यादी सुपूर्त केलेली आहे. यास आता ६ महिन्यापेक्षाही जास्त कालावधी उलटलेल असून आपण त्यावर अदयाप कुठलाही निर्णय घेतलेला नाही.

कोरोना महामारीच्या काळात बंगाल, तामिळनाडू, आसाम यासारख्या राज्यांत सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. लाखांच्या सभा झाल्या. परंतु सदर विधानपरिषद सदस्यांच्या नेमणुकीसाठी प्रत्यक्ष कोणतीही निवडणूक लावण्याची आवश्यकता नाही. आपल्या एका सहीने सदर १२ सदस्य विधानपरिषदेचे सदस्य होऊ शकतात. मात्र ६ महिन्यापेक्षाही जास्त कालावधी उलटून ही प्रक्रिया अद्याप झालेली नाही.

सदर यादीतील नावे ही आपापल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व साहित्य इ. क्षेत्रातील नामवंत व्यक्ती आहेत. राज्यघटनेने सदर तज्ञ लोकांच्या अनुभवाचा फायदा राज्य विधिमंडळाला व्हावा यासाठी कलम १७१ (५) द्वारे आपणास हा विशेष अधिकार दिलेला आहे.

सदर विधान परिषद सदस्य या घटनात्मक पदावर नियुक्त झाल्यास ते सर्व लोक कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेत अधिक प्रभावी पणे काम करू शकतील त्यांच्या अनुभवाचा फायदा राज्याला होईल.

सदर नियुक्तिसाठीची प्रक्रीया करत आजवर महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून आपण केलेल्या कामात एक अजून भर टाकत ही प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. देवरे यांनी सदर पत्र ट्वीटर, तसेच सोशियल माध्यमातुन देखील शेअर केले असून त्यांनी राज्यपालांच्या कार्यालयात दूरध्वनीद्वारे देखील संवाद साधत हि मागणी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या