Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्ह्यात इलेक्ट्रॉनिक क्लस्टर उभारण्याची मागणी

जिल्ह्यात इलेक्ट्रॉनिक क्लस्टर उभारण्याची मागणी

दे. कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्प (Electronic Manufacturing Cluster Project )नाशिकला आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याने या बाबतचे सविस्तर पत्र खा. गोडसे ( MP Hemant Godse ) यांनी महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळाचे ( MIDC ) सीईओ डॉ. पी. अलबलगण ( MIDC CEO Dr. P. Albalgan )यांना दिले असता त्याची तातडीने दखल घेत अलबलगण यांनी प्रकल्पासाठी लागणार्‍या जागेविषयीचा अहवाल पाठविण्याचे पत्र जिल्हाधिकार्‍यांना पाठविले आहे.

- Advertisement -

दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढत असून करोनाकाळात या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. अनेक उद्योग, व्यवसायांचीही परिस्थिती ढासळत चालली आहे . यावर उपाय म्हणून मोठे व सक्षम प्रकल्प उभारणे गरजेचे आहे. यातून नाशिक शहरालगतील ग्रामीण भागात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्प उभारण्याचा खा. हेमंत गोडसे यांचा मानस आहे.

सदर प्रकल्प आता प्रस्तावित स्वरूपाचा असून याविषयी खा. गोडसे यांनी महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळाचे सीईओ डॉ. पी. अलबलगल यांची भेट घेतली. इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्पाचे महत्त्व, गरज व बेरोजगारी हटविणे हे लक्षात घेऊनच डॉ. पी. अलबलगण यांनी तातडीने जिल्हाधिकारी डी. गंगाधरन यांना पत्र पाठविले आहे.

शहरालगतच्या ग्रामीण भागात शंभर एकरहून अधिक शासकीय जागा कोण-कोणत्या ठिकाणी उपलब्ध आहेत. याविषयीचा सविस्तर अहवाल पाठविण्याच्या सूचना यात करण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार यांच्यासाठी हा प्रकल्प अतिशय महत्त्वपूर्ण ठरणारा आहे. यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहोत. शासकीय यंत्रणा देखील याचे महत्त्व ओळखून मदत करीत असल्याने लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.

खा. हेमंत गोडसे ( MP Hemant Godse )

- Advertisment -

ताज्या बातम्या