ग्रामसेवक संघाच्या शिष्टमंडळाची मागण्यांबाबत मंत्री मुश्रीफ यांच्याशी चर्चा

jalgaon-digital
1 Min Read

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाच्या मागणीपत्रानुसार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दालनात अप्परमुख्य सचिव ग्रामविकास अवरसचिव व कक्ष अधिकारी यांचे उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत ग्रामसेवकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा झाली.

ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन पदे रद्द करून ग्रामसेवक निवडीची शैक्षणिक पात्रता पदवी करून ग्रामसेवक एकच पद निर्माण करावे व दुसरी पदोन्नती थेट विस्तार अधिकारी द्यावी ही आग्रही मागणी केली.20 ग्रामपंचायत मागे एक विस्तार अधिकारी पद निर्माण करून 505 विस्तार अधिकारी पदे निर्माण करणेत यावीत.

कायम प्रवास भत्ता 1500 रुपायांवरून वाढ करून 3000 रुपये करणेत यावा व सदरबाबत फिरती दौरा मंजूर करण्याची जाचक अटी काढून टाकण्यात याव्यात असे सूचित केले. जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत मागणी करण्यात आली. आदी सर्व बाबीवर मंत्री महोदय यांनी नवीन आर्थिक भार विरहित मागण्यांबाबत लवकरच निर्णय घेऊ व आर्थिक बोजा पडणार्‍या मागण्यांबाबत करोना लाट आटोक्यात आल्यानंतर पुन्हा बैठक लावण्याचे मुश्रीफ यांनी शिष्टमंडळास आश्वासन दिले.

यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ राज्य अध्यक्ष विजय म्हसकर, सरचिटणीस के. आर. किरुळकर, राज्य उपाध्यक्ष सागर सरावणे, राज्य सचिव अनिल जगताप, छत्रपती ग्रामसेवक पतसंस्था चेअरमन सुदाम बनसोडे, व्हा चेअरमन, ज्ञानेश्वर मेहेत्रे, श्रीगोंदा अध्यक्ष नवनाथ गोरे, भाऊसाहेब भांड, संतोष देशमुख, कारभारी जाधव, दत्ता जंगाले तसेच राज्यातील इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *