Friday, April 26, 2024
Homeनगरबदनामी करणार्‍या पाच जणांना अटक

बदनामी करणार्‍या पाच जणांना अटक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

इंस्टाग्राम आणि शेअर चॅटवर बनावट अकाउंट तयार करून तसेच अश्लील मेसेज पाठवून महिलांची बदनामी करणार्‍या पाच गुन्ह्यांतील आरोपींना अटक करण्यात आली आहे. सायबर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

- Advertisement -

आरोपींमध्ये तीन तरुणींसह एक अल्पवयीन आणि किरण अंकुश थोरात (रा. कर्जत) यांचा समावेश आहे. इंस्टाग्राम आणि शेअर चॅटवर बनावट अकाउंट बनवून अश्लील आणि बदनामी करणारा मजकूर प्रकाशित केल्याप्रकरणी पाच महिलांनी विविध कलमान्वये पाच स्वतंत्र गुन्हे सायबर पोलिसांत दाखल केले होते. तांत्रिक विश्लेषण करून सायबर पोलिसांच्या पथकाने इंस्टाग्राम आणि शेअर चॅटवर अकाउंट तयार करून बदनामी करणार्‍या आरोपींना अटक केली आहे.

सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या सूचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक कोळी, सचिन रणवरे, पोहेकॉ. योगेश गोसावी, उमेश खेडकर, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, राहुल हुसळे, अरुण सांगळे, कॉ. गोटे, खताळ, घोडके, चेके, वासुदेव शेलार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सायबर पोलिसांचे आवाहन…

या गुन्ह्यातील सर्व आरोपी हे अल्पवयीन आणि तरुण आहेत. किरकोळ वादातून अल्पवयीन मुले आणि मुली अशा प्रकारचे गुन्हे करत आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या