Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात करोनाच्या पॉझिटीव्हिटी दराबरोबरच ऑक्सिजन वापरातही घट

राज्यात करोनाच्या पॉझिटीव्हिटी दराबरोबरच ऑक्सिजन वापरातही घट

मुंबई – राज्यात कोविड 19 च्या पॉझिटीव्हिटी दराबरोबरच ऑक्सिजन वापरातही घट झाली आहे अशी सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 17 जून 2021 रोजी संपूर्ण राज्यात रुग्णांद्वारे वापरात असलेल्या ऑक्सिजनसुविधायुक्त खाटांची एकूण संख्या 16,570 इतकी असून ही संख्या घट दर्शवणारी आहे. ही संख्या 35,000 पेक्षा कमी असल्याने राज्यस्तरीय ऑक्सिजन यंत्रणा पुढील आठवड्यात कार्यरत राहणार नाही. तर

- Advertisement -

आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे, कोव्हिड-19 पॉझिटीव्हीटीचा वेग आणि वापरात असलेल्या ऑक्सिजन सुविधायुक्त खाटा यांच्या आकडेवारीच्या आधारे बंधनांचे कोणते स्तर लागू करावेत याबाबत 4 जून रोजी जारी केलेले आदेश संदर्भ मानून त्या त्या प्रशासकीय क्षेत्रात कोणत्या स्तराची बंधने लागू करावीत, याबाबतचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी घेऊ शकतील. स्थानिक प्रशासनाने प्रत्येक क्षेत्रासाठी घोषित करण्यात आलेल्या स्तरांची अंमलबजावणी येत्या सोमवारपासून लागू करावी.

- Advertisment -

ताज्या बातम्या