Friday, April 26, 2024
Homeनाशिकजिल्ह्यात आज १५ करोना बळी

जिल्ह्यात आज १५ करोना बळी

नाशिक । प्रतिनिधी

शहरासह जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या आकडेवारीचा स्फोट असून गुरुवारी (दि.१) ३ हजार ८७४ पाॅझिटिव्ह रुग्ण अाढळले. त्याहून चिंतेची बाब म्हणजे दिवसभरात १५ करोना पाॅझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

नाशिक जिल्हा राज्यात करोनाचा हाॅटस्पाॅट झाला असून रोज तीन ते चार हजार पाॅझिटिव्ह रुग्णांचि भर पडत आहे. शहरासह जिल्ह्यात कडक निर्बंध लावूनही करोना रुग्णांचा आकडा कमी होत नसल्याने यंत्रणेपुढिल धोका वाढला आहे.

काल नाशिक महापालिका हद्दित २ हजार २६२ करोना बाधित सापडले. नाशिक ग्रामीणमध्ये १ हजार ३३५ रुग्ण आढळले. तर मालेगाव मनपा हद्दित १३६ व जिल्हाबाह्य ५१ करोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे. त्यात दिवसभरात १५ रुग्णाचा करोनाने बळी घेतला.

करोनाने झालेले मृत्यु

नाशिक मनपा – ४

नाशिक ग्रामीण – ११

- Advertisment -

ताज्या बातम्या