Friday, April 26, 2024
Homeनगरदौंड-मनमाड रेल्वेमार्गावरील दुहेरीकरणाच्या कामास गती द्यावी - जोशी

दौंड-मनमाड रेल्वेमार्गावरील दुहेरीकरणाच्या कामास गती द्यावी – जोशी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

दौंड-मनमाड रेल्वेमार्गावरील दुहेरीकरण कामास गती देण्यात यावी, अशी मागणी हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव व रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य संजय दादा जोशी यांनी केली आहे.

- Advertisement -

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे याबाबत निवेदन पाठविण्यात आले आहे. दौंड-मनमाड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्याचे काम संथगतीने सुरू आहे ते नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी या कामास भरीव निधीची पूर्तता करून काम जलदगतीने सुरू करावे, अशी मागणी श्री. जोशी यांनी केली आहे.

तसेच शिर्डी-पुणतांबा व दौंड-पुणे कॉर्ड रेल्वेमार्गास विशेष निधी मंजुरी देऊन दुहेरीकरणाचे व विद्युतीकरणाचे काम सुरू करावे, त्यामुळे रेल्वेमार्गावरील प्रवासात दोन तास वेळेची बचत होऊन या कामास होणार्‍या विलंबामुळे नवीन रेल्वे सुरूकरण्यास अडचणी येत आहे, असे संजय जोशी यांनी स्पष्ट केले आहे.

दौंड-मनमाड रेल्वेमार्वावरील काष्टी ते अंकाई रेल्वेमार्गाचा सोलापूरऐवजी पुणे विभागात समावेश करण्याच्या प्रलंबित मागणीस रेल्वे मंत्रालयाने त्वरीत मंजुरी द्यावी. जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना पुणे येथे जाण्यासाठी स्वतंत्र डेमू रेल्वे सुरू करावी. रात्री सुटणारी पुणे-मनमाड पॅसेंजर सुरू करावी व विद्यार्थी, शासकीय कर्मचारी, व्यापारी यांची गैरसोय दूर करण्यासाठी मासिक पास योजना पूर्ववत सुरू करावी, आदी मागण्यांसंदर्भात लवकरच रेल्वे राज्यमंत्री श्री. दानवे यांची भेट घेऊन लक्ष वेधण्यात येणार असल्याचे जोशी यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या