Friday, April 26, 2024
Homeनगरसुनेच्या विनयभंग प्रकरणी मावस सासर्‍यास 2 वर्षाचा कारावास

सुनेच्या विनयभंग प्रकरणी मावस सासर्‍यास 2 वर्षाचा कारावास

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पती कामावर गेल्याचा गैरफायदा घेत नात्याने मावस सासरा असणार्‍याने विवाहितेचा विनयभंग केला होता. याप्रकरणी . न्यायाधीश व्ही. आय. शेख यांनी दोन वर्ष कैद व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

- Advertisement -

भास्कर आश्रुबा दहिफळ असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शहराच्या जवळच असलेल्या एका गावात 26 फेबु्रवारी 2017 रोजी हा प्रकार घडला होता. महिलेचा पती रात्री कामावर गेल्याचा गैरफायदा घेवून नात्याने मावस सासरा असलेल्या दहिफळ याने एकट्या असलेल्या पिडीत महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला होता. त्याने पिडीतेशी लगट करून पिडीतेचा विनयभंग केला त्यास पिडीतेने प्रतिकार केला असता आरोपी भास्कर दहिफळे याने पिडीतेचे तोंड दाबून या घटनेची वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. व तेथून आरोपी पळून गेला होता.

यामुळे दुसर्‍या दिवशी पिडीतेने तिच्या पतीला हकीगत सांगितली. पिडीतेच्या पतीने आरोपी भास्कर दहिफळे यास जाब विचारला असता आरोपीने रागाने पिडीतेच्या पतीला व पिडीतेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे पिडीतेने पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार एम.एस.पठाण यांनी करून न्यायालयात सन 2018 मध्ये दोषारोप पत्र दाखल केले होते. सदरील खटल्यात फिर्यादी पक्षा तर्फे सरकारी वकील नितीन एस. भिंगारदिवे यांनी एकूण 4 साक्षीदार तपासले.

- Advertisment -

ताज्या बातम्या