Saturday, April 27, 2024
Homeनगरदारणा 42 टक्क्यांवर, भावली 46 टक्के

दारणा 42 टक्क्यांवर, भावली 46 टक्के

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

सह्याद्रीच्या घाट माथ्यावर पावसाचा जोर काहीसा कमी झाला. दारणाच्या पाणलोटातील घोटी, इगतपुरी भागात पावसाच्या सरी अधूनमधून कोसळत आहेत.

- Advertisement -

दारणाच्या जलाशयात काल सकाळी उपयुक्त साठा 42 टक्क्यावर पोहचला होता. तर भावली 46 टक्क्यावर पोहचले होते. भावली उद्या पर्यंत निम्मे होईल. काल दारणाच्या पाणलोटतील इगतपुरी ला 62 मिमी पाऊस झाला. दारणाच्या भिंतीजवळ 11 मिमी पाऊस झाला. भावलीला 70 मिमी पाऊस झाला. 7149 क्षमतेच्या दारणात 2986 पाणी साठा आहे. दारणात 41.77 टक्के भरले आहे. भावली धरणात 46.26 टक्के पाणीसाठा झाला. 1434 क्षमतेच्या भावलीत 660 दलघफू पाणी साठा झाला आहे.

गंगापूर धरणाच्या पाणलोटात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडतो आहे. त्यातही सातत्य नाही. काल सकाळी 6 पर्यंत गंगापूर च्या पाणलोटतील आंबोलीला 30 मिमी, त्र्यंबक 35 मिमी पाऊस झाला. गंगापूरच्या भिंतीजवळ 12 मिमी पाऊस झाला. कश्यपीला 14 मिमी, गौतमी गोदावरी 18 मिमी पाऊस झाला. 24 तासात गंगापूर मध्ये 65 दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाले. या धरणात कालपर्यंत एकूण 144 दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाले. 5630 क्षमतेच्या गंगापूर मध्ये 31.99 टक्के पाणी साठा आहे.

अन्य धरणाचे पाणी साठे असे – मुकणे 46.26 टक्के, वाकी 2.93 टक्के, भाम 13.68 टक्के, वालदेवी 19.15 टक्के, कश्यपी 16.20 टक्के, गौतमी गोदावरी 12.42 टक्के, कडवा 21.74 टक्के, आळंदी 1.72 टक्के असे साठे आहेत.

उर्वरित जिल्हा पावसाच्या प्रतिक्षेत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अकोले तालुका वगळता जिल्ह्यातील अन्य तालुक्यात अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. पाऊस वाकुल्या दाखवत असल्याने शेतकरी पेरणी करायच्या की नाही याबाबत संभ्रमावस्थेत आहेत.

मुळा आणि भंडारदरा पाणलोटात पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणांच्या पाण्यात वाढ होत आहे. असे याचे समाधान असलेतरी लाभक्षेत्रात पाऊस गायब झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. पेरणीसाठी बियाणं, खतांची खरेदी शेतकरी करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या