Thursday, April 25, 2024
Homeनगरघाटमाथ्यावर पावसाचा जोर

घाटमाथ्यावर पावसाचा जोर

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

दारणा, भावली च्या पाणलोटातील घाटमाथ्यावर काल पावसाची जोरदार बॅटींग सुरु होती. त्यामुळे या दोन्ही धरणात नवीन पाण्याची चांगली आवक होत होती. काल सकाळी 6 वाजे पर्यंत दारणाचा साठा 75.81 टक्क्यांवर पोहचला होता. तर भावली 87.17 टक्के भरले होते.

- Advertisement -

घाटमाथ्यावर पावसाचा जोर टिकून आहे. काही कमी अधिक विश्रांती नंतर दारणाच्या पाणलोटात पावसाचे जोरदार आगमन होत होते. काल सकाळी मागील 24 तासात दारणाच्या पाणलोटातील इगतपुरी येथे 36 मिमी, भावलीला 54 मिमी पावसाची नोंद झाली. कालच्या दिवसभरातील पावसाने या धरणांच्या जलाशयात अधिकचे नवीन पाणी दाखल होणार आहे. काल सकाळी 6 वाजता मागील 24 तासात दारणात 255 दलघफू नवीन पाणी दाखल झाले.

त्यामुळे सात टिएमसीच्या दारणात साडेपाच टिएमसी पाणीसाठा झाला आहे. मुकणे धरणात काल 54.21 टक्के पाणीसाठा झाला होता. भावली गेल्या वर्षी कालच्या तारखेला तुडूंब भरले होते. काल या धरणात 87.17 टक्के पाणी आहे. वाकी धरण 18.50 टक्के, भाम 47.36 टक्के, कश्यपी 25.97 टक्के पाणीसाठा आहे.

गंगापूर धरण परिसरात काल अधून-मधून पावसाचे मध्यम आगमन होत होते. हे धरण 47.46 टक्के भरले आहे. गंगापूरच्या पाणलोटातील त्र्यंबक, अंबोली परिसरातील जोरदार पावसाने या धरणात नवीन पाण्याची आवक होवू लागली आहे. काल सकाळी 6 वाजता संपलेल्या मागील 24 तासात गंगापूर मध्ये 144 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. गंगापूर समुहातील कश्यपी 25.97 टक्के, गौतमी गोदावरी 26.07 टक्के, कडवा 32.35 टक्के, आळंदी 11.40 टक्के भरले आहे.

दरम्यान नाशिक, निफाड भागातील पावसाचे पाणी नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात दाखल होत असल्याने या बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत 500 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. काल सकाळी पर्यंत 744 दलघफू पाणी गोदावरीतून वाहिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या