Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यादारणा धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ; लवकरच विसर्गाला होणार सुरुवात

दारणा धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ; लवकरच विसर्गाला होणार सुरुवात

नाशिक l प्रतिनिधी Nashik

दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात (darana dam water catchment area) सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाची पाणी पातळी (dam water level) वाढली आहे. प्राप्त माहितीनुसार आज सकाळी धरण ४९ टक्के भरले आहे….

- Advertisement -

संततधार पाऊस सुरूच असल्यामुळे पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे आज (दि.१०) रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास १ हजार ५०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग (water discharge) करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने हा विसर्ग वाढविण्यात येईल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

धरणातून पाणी सोडल्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. नदीकाठी वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या