डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयात करोना योद्ध्यांचा सत्कार

jalgaon-digital
3 Min Read

देसराणे । वार्ताहर Desrane / Dangsaundane

गेल्या काही महिन्यांपूर्वी बागलाण तालुका करोना हॉटस्पॉट झाला होता आणि डांगसौंदाणे येथे समर्पित करोना केंद्र कार्यान्वित करण्यात आले. या समर्पित करोना केंद्रातील आरोग्य कर्मचारी करोना योद्ध्यांंना नुकतेच महाराष्ट्र निसर्ग पर्यावरण संस्थेतर्फे सन्मानित करण्यात आले.

येथील वैद्यकीय अधीक्षक या नात्याने रुग्णालयाची धुरा डॉ. संदीप घोंगडे यांचेकडे असून ते बालरोग तज्ज्ञ आहेत. त्यांना स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.जगदीश चौरे व इतर वैद्यकीय अधिकारी, डॉ. रुपेश खैरनार, डॉ राहुल खैरनार, डॉ. दिनेश पंचभाई , डॉ. कुणाल मोरे, डॉ. अश्विनी देवरे, डॉ.राजश्री भामरे, डॉ. स्वाती खैरनार यांची करोनाच्या सुरुवातीच्या काळात जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वास देवरे, डॉ.वीरेंद्र आवारी यांचीही साथ मिळाली. रुग्ण सेवेच्या कामात शुश्रूषा संवर्गातील ज्योती महाजन, आम्रपाली बोरसे, हेमंत देवरे, करणकुमार शेवाळे, सायली निकम, प्रज्ञा महिरे यांचे मोलाचे योगदान लाभल्याचे डॉ घोंगडे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

करोना बाधित रुग्णांची सेवा करताना वैद्यकीय अधिकारी डॉ. घोंगडे, डॉ. चौरे, डॉ. देवरे, क्षकिरण वैज्ञानिक अधिकारी यांनासुद्धा कोरोना संसर्ग झाला. काही दिवस विश्रांती घेऊन चौघेही नव्या जोमाने सेवा बजावत आहेत. डॉ. घोंगडे यांच्या कुटुंबातील तर चौघे बाधित झाले होते. बागलाण तालुक्यातील आदिवासी पट्ट्यातील ह्या रुग्णालयाचे रुपडे बदलत असून हे रुग्णालय चार एकर परिसरात वसलेले आहे.

रुग्णालयाच्या आवारात राम मंदिर व खडकाई माता अशी दोन मंदिरे मनःशांतीसाठीची साधने असून यासोबतच डॉ. घोंगडे यांनी सुमारे दोनशे फुलझाडांची व वृक्षांची लागवड केलेली असून छोटेखानी बगिचा विकसित करण्यात आला आहे. या वृक्ष लागवडीचे सर्व श्रेय वैद्यकीय अधीक्षक डॉ संदीप घोंगडे आणि संवर्धक सर्व संतोष दुसाने, रवी शिंदे , भास्कर ठाकरे, सुनील ढाबळे, कांतीलाल पवार, सुनील पवार, भास्कर ठाकरे, प्रकाश सोनवणे, फुलाबाई भोये, अलका पवार यांना जाते.

करोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर व मुख पट्टी वापरून आज पार पडलेल्या या गौरव समारंभात प्रातिनिधिक स्वरुपात वैद्यकीय अधीक्षक डॉ संदीप घोंगडे यांचा महाराष्ट्र निसर्ग पर्यावरण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जलतज्ज्ञ डॉ. किशोर कुवर यांचे हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देवून तर शुश्रुषा संवर्ग, तांत्रिक संवर्ग प्रशासन विभाग व स्वच्छता कर्मचार्‍यांपैकी प्रत्येकी एकाचा गुलाबपुष्प व प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी शुश्रुषा संवर्गातील अधिपरिचारिका ज्योती महाजन, करणकुमार शेवाळे,प्रज्ञा महिरे, सायली निकम, सुवार्ता देसाई, उखडी देसाई, रेखा बहिरम, सुरेखा पाडवी कार्यालयीन अधीक्षक महेंद्र महाले, औषध निर्माण अधिकारी विकास थोरात, वर्ग चार कर्मचारी संतोष दुसाने, रवी शिंदे, भास्कर ठाकरे, संगीता शिंदे, संतोष मोरे, योगेश बर्डे, कांतीलाल पवार आदी कर्मचार्‍यांना गौरविण्यात आले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *