Thursday, April 25, 2024
Homeनगरधोकादायक इमारती उतरविण्याची कारवाई सुरू

धोकादायक इमारती उतरविण्याची कारवाई सुरू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिकेकडून शहरातील धोकादायक इमारती (Dangerous Buildings) उतरविण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी माळीवाडा (Maliwada) येथील अत्यंत धोकादायक झालेली जुनी इमारत (Dangerous Buildings) महापालिकेच्या पथकाने (Municipal Squad) जमीनदोस्त केली.

- Advertisement -

करोनाची अचानक उसळी !

पावसाळा तोंडावर आला असतानाही महापालिकेकडून धोकादायक इमारतींवर (Dangerous Buildings) कारवाई होत नव्हती. धोकादायक म्हणून घोषित केलेल्या 7 व नोटिसा बजावण्यात आलेल्या 120 पैकी एकाही इमारतीवर महापालिकेकडून कारवाई झालेली नव्हती. काही इमारतींचे वाद (Disput) न्यायालयात प्रलंबित असल्याने अडचणी येत होत्या. मात्र, मनपाने पुन्हा माहिती संकलित करून धोकादायक असलेल्या 15 इमारती पाडण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. महापालिकेने (Municipal Corporation) यापूर्वी 12 इमारती धोकादायक असल्याचे व त्या तात्काळ उतरविण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यापैकी अद्यापही 7 इमारतींवर कारवाई झालेली नव्हती.

त्यामुळे महापालिकेने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. संबंधित घरमालक, भाडेकरू, भोगवटदारांना वारंवार नोटीस देऊनही त्यांनी इमारत न उतरविल्याने मनपाकडून कारवाई सुरू करण्यात आल्याचे शहर अभियंता सुरेश इथापे यांनी सांगितले. त्यानुसार माळीवाडा येथील जुनी इमारत उतरविण्यात आली आहे. इथापे यांच्यासह अतिक्रमण निर्मूलन विभागाचे क्षेत्रीय अधिकारी रिजवान शेख, अग्निशामक दलाचे पथक व कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

ऊस पिकांच्या नोंदी आता अ‍ॅपद्वारे होणार

- Advertisment -

ताज्या बातम्या