Thursday, April 25, 2024
HomeजळगावPhoto : 16 कलमी कार्यक्रमात डांभुर्णी जि.प.केंद्र शाळा तालुक्यात अव्वल

Photo : 16 कलमी कार्यक्रमात डांभुर्णी जि.प.केंद्र शाळा तालुक्यात अव्वल

यावल। Yaval प्रतिनिधी

तालुक्यातील डांभूर्णी (Dambhurni) येथील जि.प.केंद्र शाळेने (ZP Kendra School) 16 कलमी कार्यक्रमातील (16 point program) सर्वच्या सर्व 16 कलमे पूर्ण करुन तालुक्यात अव्वल (tops) येण्याचा मान मिळविला आहे.

- Advertisement -

डॉ.पंकज आशिया (Dr. Pankaj Asia) मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.जळगांव यांच्या मार्गदर्शनाखाली जि. प. शाळांसाठी 16 कलमी कार्यक्रम राबविण्यात येत असून त्या अंतर्गत त्यात शाळेत सुंदर, आकर्षक अशी बाग तयार केली आहे.

16 कलमांतर्गत (16 point program) वॉलपेटींग , रेन वॉटर हार्वेस्टींग, संगणक, अदयावत विदयुतीकरण हॅन्डवांश स्टेशन, संरक्षण भिंत, परसबाग, डिजीटल वर्ग, सुविधायुक्त मुलांमुलींसाठी स्वच्छतागृह, सोलर पॅनल, सेमी इंगजी वर्ग, खेळाचे साहित्य, ग्रंथालय, वृक्षारोपन, गणित कट्टा, भौमितीक आकार, वाहतूक सुरक्षा मॉडेल तसेच शिक्षकांसाठी बायोमेट्रीक हजेरी इ.16 कलमांचा समावेश आहे.

शाळेत 16 कलमी कार्यक्रम राबविण्यासाठी पंचायत समिती (Panchayat Samiti) यावलच्या सभापती सौ.पल्लवी चौधरी (Speaker Pallavi Chaudhary) आणि डांभूणीचे माजी सरपंच व विदयमान उपसरपंच पुरूजीत चौधरी यांचे सहकार्य लाभले. तसेच गावातील दानशुर व्यक्ती (शाळेचे माजी विद्यार्थी) यांनी वेळोवळी सहकार्य केले.

शाळेच्या प्रगतीसाठी गटशिक्षणाधिकारी (Group Education Officer) एन.के शेख व डांभूर्णी केंद्राचे केंद्रप्रमुख प्रदीप सोनवणे व शाळा व्यवस्थापन समिती यांचेही मार्गदर्शन लाभले. या कामी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले.

16 कलमी कार्यक्रम राबविल्यामुळे शाळेच्या बाह्यांग, सुविधा व गुणवत्तेत भर पडल्यामुळे गावात पालक, ग्रामस्थ व विदयार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जिल्हयातील सर्वोत्कृष्ट शाळा बनविण्याचा निर्धार उपसरपंच पुरूजीत चौधरी यांनी केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या