Friday, April 26, 2024
Homeनगरदलितांवर होणार्‍या अत्याचाराच्या विरोधात रिपाइंची निदर्शने

दलितांवर होणार्‍या अत्याचाराच्या विरोधात रिपाइंची निदर्शने

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

देशात दलितांवर होणार्‍या अन्याय, अत्याचाराच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने जाऊन निदर्शने करण्यात आली. नुकतेच राजस्थानमधील जालोर जिल्ह्यात लहान मुलाची झालेल्या अमानवी हत्येचा निषेध नोंदविण्यात आला.

- Advertisement -

या आंदोलनात रिपाइंचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, दानिश शेख, गुलाम शेख, संतोष पाडळे, ज्योती पवार, अलका बोर्डे, संपदा म्हस्के, पुजा साठे, संदीप वाघचौरे, निजाम शेख, जमीर इनामदार, बंटी बागवान, इमरान शेख, हुसेन चौधरी, मोहसीन शेख, विनीत पाडळे, जावेद सय्यद, नईम शेख आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. राजस्थानमधील जालोर जिल्ह्यात मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

नऊ वर्षीय मागासवर्गीय कुटुंबातील इंद्रपाल या विद्यार्थ्याने मुख्याध्यापकाच्या माठेतून एक ग्लास पाणी पिल्याने, त्याला बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही मागासवर्गीय समाज बहिष्कृतच आहे. एका बालकाचा जातीयवादी प्रवृत्तीतून बळी गेला असून, ही निंदनीय बाब असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या