Friday, April 26, 2024
Homeनगर‘सार्वमत’ने आपली वेगळी मुद्रा निर्माण केली - आ. कानडे

‘सार्वमत’ने आपली वेगळी मुद्रा निर्माण केली – आ. कानडे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

सार्वमतने आपली स्वतःची वेगळी अशी मुद्रा निर्माण केली. ही मुद्रा म्हणजे सर्वसामान्य ग्रामीण भागातील कष्टकर्‍यांचे दुःख समजणारी आहे.

- Advertisement -

त्यांना काय हवे आणि काय नको हे सार्वमत देत असल्यामुळे सार्वमत हे ग्रामीण भागातील एक आवडते दैनिक म्हणून नावारुपास आले असल्याचे प्रतिपादन आ. लहु कानडे यांनी केले.

दैनिक सार्वमतच्या 45 व्या वर्धापनदिनानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या अंकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, किसान कनेक्टचे संचालक किशोर निर्मळ, अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मंजुश्रीताई मुरकुटे, साई मल्टीस्टेटचे अध्यक्ष शिवाजीराव कपाळे, दैनिक सार्वमतचे कार्यकारी संपादक अनंत पाटील, श्री इपेक्सचे संचालक अविनाश कुदळे, चंदूकाका ज्वेलर्सचे अमित कोठारी आदी उपस्थित होते.

कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम श्रीरामपूर नगरपालिका टिळक वाचनालयाच्या आगाशे समभागृहात पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सार्वमतला शुभेच्छा दिल्या. सार्वमतचे कार्यकारी संपादक अनंत पाटील, जाहिरात व्यवस्थापक राहुल भिंगारदिवे, वृत्तसंपादक अशोक गाडेकर, वृत्तसंपादक बद्रीनारायण वढणे, सहाय्यक जाहिरात व्यवस्थापक रियाज पठाण, वरिष्ठ उपसंपादक राजेंद्र बोरसे, मार्केटिंग अधिकारी गोविंद केंगे यांनी शुभेच्छांचा स्विकार केला.

यावेळी आ. लहू कानडे म्हणाले, वृत्तपत्र म्हणून सार्वमतने ग्रामविकासाचे काम हाती घेऊन आपण प्रकाशित केलेली ग्रामविकासाची पुस्तिका ही मार्गदर्शक ठरेल.

माजी आमदार भानुदास मुरकुटे म्हणाले की, ‘चांगल्याला चांगल, आणि वाईटाला वाईट’ म्हणण्याची दानत सार्वमतमध्ये असल्यामुळे सार्वमतने वाचकांच्या मनात स्थान मिळविले आहे. जिल्ह्याचेच नव्हे तर राज्य व देश पातळीवरील प्रश्न मांडण्याचे काम केले आहे. सार्वमतच्या कर्तृत्वामुळे दैनिक सार्वमतला चांगला वाचक वर्ग मिळाला आणि सार्वमतने चांगली प्रगती केली आहे. नगर जिल्ह्यातील एक चांगले दैनिक म्हणून लौकीक मिळविला आहे.

माजी आमदार भाऊसाहेब कांबळे म्हणाले की, दैनिक सार्वमतने श्रीरामपुरातच नव्हे तर जिल्ह्यात जडणघडणीचे मोठे काम केले आहे. सडेतोड शब्दांत आपली विचारधारा या दैनिकातून मांडत असतात. त्यामुळे सर्वांचा आवडता पेपर म्हणून हे वृत्तपत्र नावारुपास आले आहे.

साई मल्टीस्टेटचे अध्यक्ष शिवाजीराव कपाळे म्हणाले, सार्वमतने ग्रामीण भगात एक मोठी पकड निर्माण केली आहे.अन्यायाविरुध्द लढा देणारे एक़ वृत्तपत्र म्हणून दैनिक सार्वमतकडे पाहिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

किसान कनेक्टचे संचालक किशोर निर्मळ म्हणाले, दैनिक सार्वमत दरवर्षी वर्धापनदिनानिमित्त अशा प्रकारे कार्यक्रम आयोजित करुन सर्वांना एकत्रित करण्याचे काम करत असतो. दैनिक सार्वमत व श्रीरामपूर यांच्यातील नाते हे अतूट असे असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी प्रास्ताविक व स्वागतपर मनोगतात सार्वमतचे कार्यकारी संपादक अनंत पाटील म्हणाले, आजपयर्र्ंत सार्वमतने सर्वसामान्य माणसांचा विश्वास जपून ठेवत मार्गक्रमण केलेले आहे. याविश्वासाच्या बळावरचे दैनिक सार्वमतने 45 वर्षांचा यशस्वी प्रवास केला आहे.

नगराध्यक्षा अनुराधा आदिक, कामगार हॉस्पिटलचे विश्वस्त रवींद्र जगधने, पंचायत समिती माजी सभापती दीपक पटारे, काँगे्रेस शहराध्यक्ष संजय छल्लारे, नगसेवक राजेंद्र पवार, योगेश जाधव, आरपीआयचे सुभाष त्रिभुवन, माजी जि.प. सदस्य बाबासाहेब दिघे, पंचायत समिती सदस्या डॉ. वंदना मुरकुटे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

त्याबरोबर नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, अंजूम शेख, रवींद्र गुलाटी, हिंद सेवा मंडळाचे मानद सचीव संजय जोशी, काँग्रेस तालुकाध्यक्ष अरुण पा. नाईक, ज्ञानेश्वर मुरकुटे, बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गणपतलाल मुथा, सचीव अ‍ॅड. शरद सोमाणी, द्वारकानाथ बडधे, प्रा.अशोक बडधे, अ‍ॅड. दीपक बारहाते, बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, नगरसेवक रवी पाटील, भरत साळुंके, रवींद्र खटोड, योगेश खरात, जावेद शेख, दिलीप दायमा, देविदास देसाई, रज्जाक पठाण, गोरख कांदळकर, बाबासाहेब शेटे, अ‍ॅड. मधुकर भोसले, अविनाश पोहेकर, राजाराम कुमावत, सुनील मेहेत्रे, माजी नगरेसवक दत्तात्रय साबळे, मातोश्री फर्निचर तसेच कुकू बेक्सचे रवींद पवार, नक्षत्र कलेक्शनचे अरुण कतारे, कल्याण कुंकूलोळ, महाले ज्वेलर्सचे अमोल महाले, नयन शिंगी, मुळे मोटर्सचे अभिजित मुळे, अभिजित लिप्टे, पे्रमचंद कुंकूलोळ, अनिल छाबडा, विलास चौधरी, नंदकुमार लबडे, रवीनकुमार छाजेड, विशाल गोरे, सरपंच अशोक पवार, उपसरपंच सौ. मनिषा ढोैकचौळे, शफीभाई शहा, सतिश दुसाने, सचिन दहिवाळ, विनोद नरवडे, चंद्रकांत कवचे, किशोर बागुल, राजेंद्र कोकणे, मयुर पटारे, शिवाजी पटारे, कान्होबा खंडागळे, प्राचार्य जयकर मगर, संदिप कासार, रावसाहेब कासार, प्रा. शैलेंद्र भणगे, प्रविण निकम, अमोल गुजर, संजय गुजर, विलास ठोेंबरे, रमेश कोल्हे, भाऊसाहेब ठोंबरे, संजय अग्रवाल, सरपंच चांगदेव ढोकचौळे, अन्सार जहागिरदार,भोकर येथील अशोकचे संचालक पुंजाहरी शिंदे, संजीवनी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष रामदास शिंदे, अण्णासाहेब चौधरी, भागवतराव पटारे, गिरीधर आसने, भाऊसाहेब बांद्रे, गणेश मुदगुले, भाऊसाहेब पवार, महेंद्र पटारे, अंकुश पटारे, अर्जुन शेजवळ, शुभम लोळगे, सुमध पडवळ, किरण कटके, दत्तात्रय कांदे, विष्णू मोढे, बाळासाहेब लोंढे, आदी उपस्थित होते.

यावेळी पत्रकार गोविंद वैजापूरकर, लालमोहंमद जहागीरदार, प्रा. ज्ञानेश गवले, डॉ. एस. आर. बखळे, चंद्रकांत लांडगे, राजेंद्र देसाई, संदीप जगताप, भाऊसाहेब काळे, भाऊसाहेब जाधव, अशोक अभंग, चंद्रकांत झुुरंगे, काशिनाथ चितळकर, देविदास देसाई सार्वमतचे मार्केटींग अधिकारी सुनील करपे, कोपरगावचे नितीन जाधव, शिर्डीचे राजेंद्र पानसरे तसेच मधुकर दिघे, बाबा चौधरी, बाळासाहेब निर्मळ, सचिन आडभाई, हितेश गुंजाळ, सतीश म्हसे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या