Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रदहिहंडीतील जखमींना मिळणार शासकीय रुग्णालयात मोफत उपचार

दहिहंडीतील जखमींना मिळणार शासकीय रुग्णालयात मोफत उपचार

मुंबई | Mumbai

करोनामुळे जवळपास दोन वर्ष आपल्या उत्साहाला मुरड घालावी लागलेल्या दहीहंडी पथकांसाठी आज उत्साहाचा दिवस आहे.

- Advertisement -

कारण कोणत्याही निर्बंधांविना मुंबई, ठाणे, पुणे आणि राज्याच्या इतरही भागांमध्ये दहीहंडी उत्साहात साजरी होत आहे. राज्यात सत्तेची हंडी फोडणाऱ्या सरकारनं दहीहंडी पथकांसाठी जाहीर केलेल्या काही महत्त्वाच्या घोषणांमुळे ही हंडी पथकांसाठी अजूनच आनंदाची ठरणार आहे.

दरम्यान आज दहीहंडी असून कार्यक्रमादरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्यात यावेत अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत केली होती.

त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदेचे दवाखाने यांना नि:शुल्क वैद्यकिय उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात काढण्यात आलेला शासन निर्णय हा स्थायी असून यावर्षी पासून दर वर्षासाठी लागू राहील.

- Advertisment -

ताज्या बातम्या