Dadasaheb Phalke Award 2023 : दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

jalgaon-digital
2 Min Read

दिल्ली | Delhi

भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील तंत्रज्ञ, कलाकारांना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येणारा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा २०२३’ नुकताच रंगला. सोमवारी २० फेब्रुवारी रोजी मुंबईत दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.

संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ मधील ‘गंगूबाई’ या भूमिकेसाठी आलिया भट्टला दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. आलियाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला, तर पती रणबीर कपूरने ‘ब्रह्मास्त्र’मधील ‘शिवा’च्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला.

वरुण धवनने ‘भेडिया’साठी Critics Best Actor पुरस्कार मिळाला. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. अनुपम खेर यांना वर्षातील सर्वात अष्टपैलू अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. रेखाला चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट योगदानासाठी पुरस्कार मिळाला. अनेक सेलिब्रिटी या कार्यक्रमाला उपस्थित होते. पुरस्कार मिळालेल्या कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला.

विजेत्यांची संपूर्ण यादी:

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट: द काश्मीर फाइल्स

  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: आर बाल्की (चूप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट)

  • सर्वोत्कृष्ट अभिनेता: रणबीर कपूर (ब्रह्मास्त्र: भाग १)

  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी)

  • मोस्ट प्रॉमिसिंग अभिनेता: ऋषभ शेट्टी (कांतारा)

  • चित्रपट उद्योगातील अतुलनीय योगदानासाठी दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२३ पुरस्कार: रेखा

  • सर्वोत्कृष्ट वेब सिरीज: रुद्र: द एज ऑफ डार्कनेस

  • क्रिटिक्स सर्वोत्कृष्ट अभिनेता: वरुण धवन (भेडिया)

  • वर्षभरातील सर्वोत्तम चित्रपट: RRR

  • वर्षभरातील सर्वोत्तम दूरदर्शन मालिका: अनुपमा

  • यंदाच्या वर्षातील सर्वात अष्टपैलू अभिनेता: अनुपम खेर (काश्मीर फाइल्स)

  • टेलिव्हिजन मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता: झैन इमाम (फना-इश्क में मरजावा)

  • सर्वोत्कृष्ट पुरुष गायक: सचेत टंडन (मैय्या मैनु)

  • सर्वोत्कृष्ट गायिका: नीती मोहन, मेरी जान

  • सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर: पीएस विनोद (विक्रम वेधा)

  • संगीत उद्योगातील अतुलनीय योगदानासाठी दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२३ पुरस्कार: हरिहरन

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *