Friday, April 26, 2024
Homeनाशिकसीटीईटी परीक्षा येत्या ३१ जानेवारीला

सीटीईटी परीक्षा येत्या ३१ जानेवारीला

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी परीक्षा 2021) 31 जानेवारी रोजी होणार आहे.

- Advertisement -

ही परीक्षा देणार्‍या उमेदवारांना https://ctet.nic.in या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र (अ‍ॅडमिट कार्ड) डाऊनलोड करून घेता येणार आहेत.

सीटीईटी परीक्षेचे प्रवेशपत्र मिळवण्यासाठी संबंधित उमेदवारांना अर्ज क्रमांक, जन्म तारीख, सिक्युरिटी पिन देणे आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित संकेतस्थळावरून आपले प्रवेशपत्र लवकरात लवकर डाऊनलोड करून घ्यावे.

तसेच परीक्षेच्या एक दिवस आधी उमेदवारांनी परीक्षा केंद्राला भेट द्यावी. जेणेकरून परीक्षेच्या दिवशी केंद्रावर वेळेत पोहोचणे शक्य होईल, असे आवाहन सीटीईटीचे संचालक आणि सीबीएसईचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या