Thursday, April 25, 2024
Homeनगरपिक विमा कंपनीवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा

पिक विमा कंपनीवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना भरपाई न देणार्‍या विमा कंपनीवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी नेवासा तालुका भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीच्यावतीने नेवासा तहसील कार्यालयासमोर काल मंगळवारी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

तालुक्यात 22 हजार शेतकर्‍यांनी 14 हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचा विमा काढलेला आहे. अतिवृष्टिने काही दिवसांत हातात येणारे उत्पन्न नष्ट झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

याप्रसंगी नेवासा तालुका अध्यक्ष रामराव भदगले, डॉ. करणसिंह घुले, अशोकराव ढगे, प्रा. नानासाहेब खराडे, कारभारी गरड यांनी शेतकर्‍यांचे झालेले नुकसान, विमा कंपन्यांचा शेतकर्‍यांना फसवण्याचा डाव, शासनाची भूमिका आणि विमा कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशा आशयाची भाषणे झाली.

तहसीलदार रुपेश सुराणा यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांना निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आल्या. कल्याणराव मुरुमकर, एस. आर. शिंदे, केशव तनपुरे, पांडुरंग जाधव, बाळासाहेब शिंदे, दौलतराव शिंदे, दिनकर शेजुळ, अशोक शिंदे, मयूर तनपुरे, नरसिंग शिंदे आदींसह तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या