Saturday, April 27, 2024
Homeनगरपिकांना धोक्याची घंटा

पिकांना धोक्याची घंटा

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Devalali Pravara

सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजल्या पासून संततधार पावसाला सुरुवात झाल्याने परिसर देवळाली प्रवरा गारठून गेला आहे. परवा झालेल्या दमदार पावसानंतर काल पुन्हा संततधार पावसाला सुरुवात झाल्याने सोयाबिन पिकाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून या पिकाचे भवितव्य धोक्यात आले आहे.

- Advertisement -

सोयाबीन बरोबरच इतर पिकांनाही आता पावसाचा धोका निर्माण झाला आहे. मागे झालेल्या दमदार पावसाने काही ठिकाणी सोयाबीन पिकाची चांगली वाढ झाली आहे. हे पीक गुडघ्याला लागत आहे. पाने रुंद झाल्याने व भरपूर वाढ झाल्याने जमीन झाकून गेली आहे.यामुळे सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहचत नसल्याने खाली जमीन ओलीच असल्याने सोयाबीन पिवळ्या पडू लागल्या आहेत.

त्यातच येलो मोझाँक रोगाची टांगती तलवार आहे. तशातच संततधार पाऊस सुरू झाल्याने खरिपाच्या पिकांचे भवितव्य पावसामुळे टांगणीला लागले आहे. दरम्यान हवामान विभागाने आणखी दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकरीवर्ग चिंताक्रांत झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या