Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकसिन्नर : जोरदार पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान

सिन्नर : जोरदार पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान

पंचाळे | Panchale

रविवारच्या पाऊस व वादळी वाऱ्याचा पूर्व भागातील अनेक गावांना फटका बसला असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

- Advertisement -

सध्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरणी केलेल्या बाजरीची पीके काढणी वर आले आहे. त्यामुळे शेतकरी बाजरीची कापणीची कामे करत आहे. मका पीकही जोमदार आले असून सात ते आठ फूट उंच वाढले आहे. मक्याच्या बिट्याची वजन ताटाला पेलवत नाही, त्यातच रविवारच्या पावसा बरोबर वेगवान वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांची मक्याची पिके भुईसपाट झाली.

बाजरीची पिकेही जमिनीवर पडली असून त्यामुळे शेतकऱ्यांना अर्धवटच कापणीची कामे करावी लागणार आहे. वेगवान वाऱ्यामुळे वडांगळी पंचाळे रस्त्यावर बाभळीचे झाड पडल्याने सदर रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता.

ग्रामपंचायतीने जेसीबी द्वारे आज झाडाचा अडथळा दूर करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. कालच्या वादळाने वडांगळी आला डांबर नाला देवपुर दत्तनगर पांगरी रोड परिसरातील अनेक विजेचे पोल पडल्याने वीज पुरवठा बंद होता. महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आज दिवसभर पोल दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत केला.

कृषी खात्याच्या वतीने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या