Wednesday, April 24, 2024
Homeनगरलग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार करणार्‍या तरुणाविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

प्रवीण गहिनीनाथ खेडकर (रा. खामगाव ता. पाथर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे.

मुळची आष्टी (जि. बीड) तालुक्यातील तरुणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी नगर शहरात राहते. तिची खेडकर याच्याशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रवीण याने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. विशेष म्हणजे आरोपी खेडकर याने संबंधित पीडित मुलीची नजर चुकवून मोबाईलमध्ये विवस्त्र अवस्थेत फोटो काढले.

मुलीने खेडकर यांच्याकडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्नाला नकार दिला. तसेच पीडित मुलीला तिचे काढलेले फोटो मोबाईलवर पाठवून कुणाशीही लग्न होऊ देणार नाही अशी धमकी दिली. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून खेडकर विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या