Thursday, April 25, 2024
Homeनाशिकक्रेडाई नाशिक मेट्रोला राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान

क्रेडाई नाशिक मेट्रोला राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान

नाशिक । प्रतिनिधी Nashik

बांधकाम व्यावसायिकांची देशातील सर्वात मोठी संस्था क्रेडाईच्या 2023 ते 2025 या दोन वर्षांच्या कालावधीसाठी असणार्‍या राष्ट्रीय व राज्य कार्यकारणीची आज घोषणा करण्यात आली.

- Advertisement -

नाशिकचे सुनील कोतवाल यांची राज्य उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याचसोबत राष्ट्रीय क्रेडाईच्या कार्यकारणी मध्येदेखील नाशिकला स्थान मिळाले असून क्रेडाईच्या राष्ट्रीय सल्लागार समिती (घटना) चे प्रमुख म्हणून जीतूभाई ठक्कर यांची फेरनियुक्ती करण्यात आली. त्याचसोबत उमेश वानखेडे यांची सहप्रमुख स्किल डेव्हलपमेंट व गौरव ठक्कर यांची क्रेडाई युथ आणि वुमन विंगचे राष्ट्रीय प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पदाधिकार्‍यांनी मुंबई येथे तर राज्य कार्यकारणीच्या पदाधिकार्‍यांनी औरंगाबाद येथे झालेल्या पदग्रहण समारंभात आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. तीन दशकांपूर्वी नाशिकहून सुरू झालेल्या क्रेडाई आज देशभरात 217 शहरात विस्तारली असून 13000 हून अधिक बांधकाम व्यावसायिक क्रेडाईसोबत जोडले आहेत. महाराष्ट्र राज्यात क्रेडाई विविध 6 झोनमधील सुमारे 60 शहरात विस्तारली असून सुमारे 3000 हून अधिक सदस्य या संस्थेशी जोडले आहेत.

मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार देणार्‍या बांधकाम उद्योगात सुसूत्रता यावी, सर्व शासकीय कायद्याचे व नियमांचे पालन करून ग्राहक आणि व्यावसायिक यांच्यामध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होण्यासोबतच उत्तम निर्माण कार्य व्हावे, यासाठी क्रेडाई कार्यरत आहे. बांधकाम व्यवसायासोबत शहराचा समग्र विकास होण्यासाठी क्रेडाई स्थानिक प्रशासनासोबत नेहमीच सकारात्मक भूमिकेत असते. बांधकाम कामगारांचे कौशल्य विकास तसेच विविध शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात, यासाठीदेखील क्रेडाईतर्फे नियमित उपक्रम राबविण्यात येतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या