Friday, April 26, 2024
Homeनगरदेशातील पहिली खासगी प्रवासी ट्रेन उद्या शिर्डीत

देशातील पहिली खासगी प्रवासी ट्रेन उद्या शिर्डीत

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

भारत गौरव योजनेंतर्गत (Bharat Gaurav Yojana) देशातील पहिली खासगी प्रवासी ट्रेन (Private Passenger Train) उद्या गुरुवारी शिर्डीत (Shirdi) दाखल होत आहे. या ट्रेनला मंगळवारी कोईम्बतूर (Coimbatore) येथून हिरवा झेंडा दाखवण्यात आल्यानंतर भारतीय रेल्वेसेवेअंतर्गत खासगी ट्रेन (Private Passenger Train) प्रथमच धावली.

- Advertisement -

रेल्वेने ही ट्रेन एका सर्व्हिस प्रोव्हायडरला 2 वर्षांसाठी कराराने दिली आहे. ही ट्रेन चालविणार्‍या कंपनीने कोचमध्ये नूतनीकरण केले आहे. महिन्याला किमान तीन ट्रीप केल्या होणार आहेत. यात फर्स्ट, सेकंड आणि थर्ड एसी कोच आणि स्लीपर कोच असे एकूण 20 डबे आहेत.

ट्रेनची देखभाल हाऊसकीपिंग सर्विस प्रोवाइडर्सद्वारे केली जाईल. ट्रेनमध्ये शाकाहारी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. रेल्वे पोलिस दलासह रेल्वे कॅप्टन, एक डॉक्टर, खासगी सुरक्षा कर्मचारी असतील.

- Advertisment -

ताज्या बातम्या