Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकपुरातन महावृक्षांची ‘गणना’

पुरातन महावृक्षांची ‘गणना’

नाशिक । प्रतिनिधी Nashik

अनेक ठिकाणी वड, पिंपळ, आंबा, चिंच आदी प्रजातीची मोठमोठी आणि पुरातन वृक्ष जागोजागी आहेत.

- Advertisement -

हे महावृक्ष 50 पासून ते 100-200 वर्ष जुने आहेत. अशा महावृक्षांची स्वतंत्र नोंदणी करण्याचे अभियान राज्याच्या सामाजिक वनीकरण विभागातर्फे राबविले जात आहे.

कोलकाता येथील बॉटनिकल गार्डनमध्ये असलेला 250 वर्ष जुना वटवृक्ष असो की अनंतनाग, आंध्र प्रदेशचा सव्वाचार एकरामध्ये पसरलेला विशाल वटवृक्ष असो, ही त्याच परंपरेची उदाहरणे आहेत. महाराष्ट्रातही अशी प्राचीन व विस्तीर्ण झाडे गावोगावी आहेत.

हे महावृक्ष केवळ वयाने आणि आकाराने मोठे नसून त्यांनी आपली स्वतंत्र अशी परिसंस्थाच तयार केली आहे. त्यामुळे या महावृक्षांची नोंदणी प्रेरणादायी ठरणारी असल्याचे मत सामाजिक वनीकरण विभागाने व्यक्त केले.

याद्वारे ही झाडे कुठे आहेत, त्यांची सध्याची परिस्थिती काय आहे, आदी माहिती गोळा केली जाणार आहे. या माहितीच्या आधारे या वृक्षांचे संवर्धन करता येईल.

यासाठी स्थानिक जनसामान्यांच्या, पर्यावरणप्रेमींच्या, अशासकीय संस्थांच्या माध्यमातून ही नोंदणी केली जाणार आहे.

वनेतर क्षेत्रामध्ये वड, आंबा, पिंपळ, जांभुळ, मोहा, साग, अर्जुन आदी प्रजातींच्या विशाल झाडांची नोंदणी करण्याचे निर्देश प्रादेशिक तसेच विभागीय वनअधिकारी कार्यालयांना देण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या