Corona Update : देशात आज ३९ हजार नवे रुग्ण; उपचाराधीन रुग्ण वाढले

jalgaon-digital
2 Min Read

दिल्ली | Delhi

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान देशातील नव्या करोना रुग्णांची संख्या घटत असल्याने करोनाची दुसरी लाट आता बर्‍यापैकी नियंत्रणात आली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३९ हजार ०९७ नवे करोना रुग्ण आढळले असून ५४६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४ लाख २० हजार ०१६ वर पोहोचली आहे. तसेच देशात गेल्या २४ तासात ३५ हजार ०८७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या ०३ कोटी ०५ लाख ०३ हजार १६६ वर पोहचली आहे. तसेच देशात सध्या ४ लाख ०८ हजार ९७७ रुग्णांवर उपचार आहेत.

देशाचा रिकव्हरी रेट ९७.३५ टक्के इतका झाला आहे. आठवड्याचा आणि दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्केंपेक्षा कमीच आहे. देशाचा आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट २.२२ इतका आहे. तर दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट २.४० टक्के इतका झाला आहे. सलग ३३ दिवस दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट ३ टक्केंपेक्षा कमी आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय? (Maharashtra corona update)

राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. राज्यात काल (शुक्रवारी) ६ हजार ७५३ करोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ५ हजार ९७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६० लाख २२ हजार ४८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३३ टक्के आहे. राज्यात काल १६७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर २.०९ टक्के झाला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *