Thursday, April 25, 2024
Homeनाशिककोरोना संशयिताचे मॉकड्रिल यशस्वी : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

कोरोना संशयिताचे मॉकड्रिल यशस्वी : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

नाशिक :

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून आज कोरोना संशयिताचे नाशिक शहरात मॉकड्रिल करण्यात आले. सदरच्या मॉकड्रिल मध्ये सर्व यंत्रणांचा आपआपसात योग्य समन्वय असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कळविले आहे.

- Advertisement -

याबाबत माहिती देतांना जिल्हाधिकारी श्री.मांढरे म्हणाले, आज दुपारी 3.41 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातून जिल्हा शल्य चिकित्सकांना दूरध्वनीद्वारे, एक पांढऱ्या रंगाचा शर्ट व निळया रंगाची पँट व पायात काळ्या रंगाची चप्पल परिधान करुन सर्दी, खोकल्याचा त्रास असणारा नागरिक ठक्कर बाजार बसस्टॉपच्या परिसरात गर्दीत फिरत असल्याचे कळविण्यात आले. जिल्हा रुग्णालय येथून दुपारी 3.43 वाजता 108 क्रमांकाची रुग्णवाहिका सिक्युरिटीसह ठक्कर बाजार बस स्टॉप येथे जाण्यासाठी रवाना झाली. त्या नागरिकाची ओळख पटवुन 108 रुग्णवाहिनीवरील डॉ. शिल्पा पवार यांनी तपासणी करुन संशयित नागरिकास रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयातील कोरोना विलगीकरण कक्षात दुपारी 4 वाजता दाखल केले.

जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात डॉ.प्रमोद गुंजाळ यांनी सदर व्यक्तीची तपासणी करुन खात्री केली असता, संशयित नागरिक हा अंदाजे 30 वर्षाचा असुन 217 वाल्मिक नगर, देवळाली रोड नाशिक येथे राहतो. संशयित नागरिक 18 मार्च 2020 रोजी दुबई येथुन परतला आहे. त्याने होम क्वारंटाइन राहणे आवश्यक असतांना तो ठक्कर बाजार परिसरात फिरत असल्याचे आढळले.

राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार डॉ.प्रमोद गुंजाळ वैद्यकीय अधिकारी वर्ग 1 यांनी सदर इसमावर औषधोपचार केला. सदर इसमाच्या निकटचे सहवासीत अधोरेखित करण्यासाठी नाशिक महानगरपालिकचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र त्र्यंबके यांना कळविण्यात आले. नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांना सदर बाबतीत अवगत करण्यात आले. सरकारवाडा पोलीस स्टेशन व पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांना दूरध्वनीद्वारे कळविण्यात आले.

सदर मॉकड्रिलच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न प्रशासनामार्फत सुरु असल्याचा संदेश देण्यात सर्व यंत्रणा यशस्वी झाल्या. यात महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, पोलीस अधिक्षक डॉ.आरती सिंग, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांच्या समन्वयाने सदरचे मॉकड्रिल घेण्यात आले. यामध्ये सर्व संबधित नाशिक महानगरपालिका यांचे चांगले प्रकारचे समन्वय असल्याचे आढळून आले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे, नाशिक मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र त्र्यंबके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दावल साळवे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निखिल सैंदाणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवार व रुग्णालयीन सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी तत्परतेन शास्त्रोक्त पद्धतीने कार्यवाही केल्याचे दिसुन आले.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी परदेश दौरा करुन आलेले नागरिक यांनी 14 दिवस घराचे बाहेर पडू नये. आरोग्य विभागचे वतीने आपले आरोग्याची माहिती घेण्यात येते. घराबाहेर पडले तर त्याचे माध्यमातून कोरोनाचा प्रसार सामान्यामध्ये पसरण्याची शक्यता आहे. म्हणून जर या सूचनांचा अवलंब केला नाही तर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 33 व कलम 65 नुसार कायदेशीर कारवाई पोलिस विभागामार्फत करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कळविले आहे.
—–

दृष्टीक्षेपात कोरोनाबाबत जिल्ह्याची सद्य:स्थिती
(दिनांक 20 मार्च 2020)

सर्वेक्षण
• आजपर्यंत करोनाग्रत देशातुन नाशिक जिल्हयात आलेले एकूण नागरीक- 205
• आजर्यंत 14 दिवासांचे सर्वेक्षण पुर्ण झालेले नागरीक- 36
• आज रोजी दैनंदिन सर्वेक्षण केलेली नागरीक- 169
• आजपर्यत करोना दुषीत रुग्णांचे संपर्कातील नागरीक – 00
संभाव्य करोनाग्रस्त (ज्यांना ताप, खोकला, आहे असे)
• आज नविन दाखल – 05
• काल दाखल 07 व पुर्नतपासणी 05 त्यांचे अहवाल 00 निगेटिव्ह 34, प्रलंबित 12
• आज रुग्णालयात उपचार घेत असलेले कालचे – 07 + आजचे 05 असे एकुण 12
• आजपर्यंत दाखल झालेले -46
• आजपर्यंत उपचार पुर्ण होऊन घरी सोडलेले – 34
• तपासणी अहवाल (आजपर्यंतचे)
• आजपर्यंत घशाचे नगुने तपासणीस पाठविलेले -46
• त्यापैकी अहवाल प्राप्त निगेटीव्ह-34
• पॉझीटीव 00
• प्रलंबित 12
संस्थानिहाय
अ.क्र. संस्था/रुग्णालये आज दाखल प्रगतीपर अहवाल प्राप्त प्रलंबित
1 जिल्हा रुग्णालय नाशिक 02 40 31 09
2 सामान्य रुग्णालय मालेगांव 01 01 00 01
3 डॉ.जाकीर हुसेन रुग्णालय मनपा नाशिक 02 05 03 02
05 46 34 12

करोना देशातुन दौरा करुन आलेले नागरीक (नाशिक जिल्हयात)
यु ए ई 72 सौदी 07 युएसए 10
इटली 12 जर्मनी 07 युके 09
इराण 08 चीन 05 इतर 75
एकुण 205

स्त्रोत- जिल्हा शल्यचिकित्स, नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या