दुबईहून आलेल्या शिर्डीच्या तरुणीला केले रुग्णालयात दाखल

दुबईहून आलेल्या शिर्डीच्या तरुणीला केले रुग्णालयात दाखल

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. या पार्श्‍वभूमीवर शिर्डीत दुबई वरून आलेल्या एका तरुणीला नगर येथील शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान कोरोनाचा राज्यात मोठा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर शासनाने केलेल्या सुचनांचे पालन नागरिक करत आहेत.

शिर्डीतील एका सोसायटीमध्ये रहिवाशी असलेल्या आपल्या आई वडीलांसोबत दुबईहुन आलेली सदर तरुणी सोमवारी दि.23 रोजी सायंकाळी आली असून तिचे कुटुंब शिर्डीत वास्तव्यास आहे. ही तरुणी दुबई येथे नोकरी करत असून दुबई येथील कतारहून 18 मार्च रोजी दिल्ली येथे विमानाने आली व दिल्लीहून विमानाने मुंबईत पोहचलो होती. दरम्यान सदर युवतीचे वडील चेंबूर येथे एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होते. यावेळी हॉस्पिटलमध्ये तरुणी व तिची आई वडिलांसोबतच होते. 23 मार्च रोजी वडिलांना डिस्चार्ज झाल्यानंतर हे कुटुंब एका खासगी टॅक्सीच्या सहाय्याने मुंबईहून शिर्डीत आले.

सध्याच्या परिस्थितीनुसार बाहेरच्या देशातून आलेल्या नागरिकाला चौदा दिवस कॉरंटाईन करावे लागत असल्याने सर्व नियम तसेच शासनाचे आदेश डावलून ही तरुणी प्रवास करत शिर्डीत आल्याची माहिती प्राप्त होताच प्रांताधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सतर्कता दाखवत तातडीने माहिती दिली.

मंगळवार दि.24 मार्च रोजी शिर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांच्यासह पोलीस कर्मचारी सकाळी एक डॉक्टर, नगरपंचायतचे आरोग्य विभागाचे पदाधिकारी, कर्मचारी एक रुग्णवाहिका घेऊन फौज फाट्यासह हजर झाले. सदर तरुणीची चौकशी करून तिला धीर देत 108 नंबरच्या रुग्णवाहिकेतून नगर येथे शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. शिर्डी शहरातील नागरिकांनी स्वतःची काळजी, सतर्कता पाळणे अत्यावश्यक आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तरुणी रहिवास करत असलेल्या अपार्टमेंट आणि परिसर शिर्डी नगरपंचायतीने त्वरित निर्जंतुकीकरण केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com