Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकसंदर्भ रुग्णालयात कंत्राटी सेवकांचे आंदोलन

संदर्भ रुग्णालयात कंत्राटी सेवकांचे आंदोलन

नाशिक । प्रतिनिधी

संदर्भ सेवा रुग्णालयाल व जिल्हा रुग्णालयातील १०३ कंत्राटी कामगारांनी दोन महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे तसेच वेतन करार न झाल्याने आज (दि.५) सकाळी कामबंद आंदोलन केले. यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली. अखेर प्रशासनाने या कामगाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.

- Advertisement -

शालिमार येथील संदर्भ सेवा रुग्णालयात हे आंदोलन झाले. या रुग्णालयात तसेच शासकिय जिल्हा रुग्णालयात मिळून १०३ कंत्राटी कर्मचारी असून, ते स्वच्छता सेवक, सुरक्षारक्षक, वाहनचालक, कक्षसेवक आदी पदांवर कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना मागील तीन महिन्यांपासून मुदतवाढ देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांना वेतन मिळालेले नाही.

अनेकदा अर्ज विनंत्या करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केला होता. सोमवारी कर्मचाऱ्यांनी निवेदन सादर केले.

यानंतर मंगळवारी सकाळी ७ वाजता हे कंत्राटी कर्मचारी रुग्णालयाच्या आवारात जमा झाले. तिथे सामाजि अंतर पाळत कर्मचाऱ्यांनी धरणे देत कामबंद आंदोलन पुकारले.

या आंदोलनामुळे पायाभूत सुविधांचे काम प्रभावीत झाले. रुग्णाय प्रशासनाने अखेर या आंदोलनाची दखल घेत. मुदतवाढ करार करण्यासह थकीत वेतन देणे आणि या कर्मचाऱ्यांना सेवेत समावून घेण्याबाबत हालचाल सुरु करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. यामुळे ११ वाजता आंदोलन थांबवून कर्मचारी आपआपल्या कामावर हजर झाले. परंतु तात्काळ हि कार्यवाही न झाल्यास ando अंदोलन छेडण्या इशारा कामगारांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या