Friday, April 26, 2024
Homeजळगाव60 हजाराची लाच घेणारा कंत्राटी डॉक्टर जाळ्यात

60 हजाराची लाच घेणारा कंत्राटी डॉक्टर जाळ्यात

चाळीसगाव Chalisgaon प्रतिनिधी

कोरोना (Corona) काळात भाडेतत्वावर लावेलेल्या रूग्णवाहिकेच्या (Ambulance) बिलांची पडताळणी (Verification of bills) करून लागणारे पत्राच्या मोबादल्यात ६० हजाराची लाच (Bribe) घेणाऱ्या चाळीसगाव रुग्णालयातील (Chalisgaon Hospital) कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्याला (Contract doctor) आज एलसीबी (LCB) च्या पथकाने रंगेहात पकडले (Caught in the act) आहे.

- Advertisement -

शहरातील रहिवाशी तक्रारदार यांच्या दोन रुग्णवाहिका आहे. कोरोना काळात चाळीसगाव ट्रामा सेंटर ते चाळीसगाव तालुक्यात ने-आण करण्यासाठी भाडेतत्वावर लावले होते. रुग्णवाहिकेच्या बिलाची पडताळणी करून वैद्यकीय अधिक्षकांसह सही व शिक्क्याच्या मोबदल्यात कंत्राटी डॉक्टर मुश्ताक मोतेबार सैय्यद (वय-३८) रा. चौधरीवाडा चाळीसगाव याने ६० हजाराची लाचेची मागणी केली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज दुपारी सापळा रचून संशयित आरोपी डॉक्टर मुश्ताक मोतेबार सैय्यद याला पैसे घेतांना रंगेहात पकडला. पुढील कारवाईसाठी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या