Thursday, April 25, 2024
Homeनगरकेमिकल्सयुक्त दूषित पाण्याच्या विळख्यात 'प्रवरा'पात्र; नागरिक व प्राण्यांचे आरोग्य धोक्यात

केमिकल्सयुक्त दूषित पाण्याच्या विळख्यात ‘प्रवरा’पात्र; नागरिक व प्राण्यांचे आरोग्य धोक्यात

आरडगाव | वार्ताहर

राहुरी-श्रीरामपुर या दोन तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या प्रवरा नदीपात्रात परिसरातील साखर कारखान्याने केमिकल्सयुक्त दुषित पाणी सोडल्याने नदीपात्रातील संपुर्ण पाणी दुषित झाले आहे.त्यामुळे नदीपात्रातील माशासह वन्यजीव देखील मृत्युमुखी पडत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असुन सदर घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी लाभधारक शेतकऱ्यांनी केली आहे.

- Advertisement -

पाथरे येथे प्रवारा नदीपात्रात गेल्या काही दिवसांपासून परीसरातील साखर कारखान्याचे केमिकल्सयुक्त (मळीमिश्रीत) दुषित पाणी टँकरच्या साह्याने सोडले जात असल्याने प्रवरा नदी पात्रता काळ्याकुट्ट पाणी होऊन हे पाणी पिण्यास तसेच वापरण्यास उपयुक्त नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर घटनेने राहुरी तालुक्यातील खुडसरगाव, माहेगाव, मालुंजा खुर्द, पाथरे महालगाव, दरडगाव, लाख, महाडूक सेंटर शेवनवाडगांव, कोपरे,तिळापुर तर श्रीरामपुर तालुक्यातील मालुंजा बुद्रुक, भेर्डापूर, लाडगाव, केसापुर या दोन्ही तालुक्यातील लाभधारक शैतक-यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नदीपात्रातील मासे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत असल्याने याच माशांना वन्यजीव खात असल्याने ते देखील मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे हा प्रश्न लवकरात-लवकर मार्गी लावावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल आसा इशारा अजित जाधव, नारायण टेकाळे, आप्पासाहेब पवार, रखमाजी जाधव, शिवाजी टेकाळे, बाळासाहेब जाधव, खंडेराव जाधव, संभाजी निमसे, विजय जाधव, विजय काळे, सोमनाथ जाधव, ज्ञानेश्वर गावडे, रामकृष्ण टेकाळे, बी एम जाधव, गीताराम घारकर, भिकाभाऊ जाधव, भाऊसाहेब जाधव, दिलावर पठाण, दत्तात्रय टेकाळे, दत्तात्रय जाधव, रंगनाथ जाधव आदि शेतक-यांनी दिला आहे.

गेल्या काही दिवसांन पासून प्रवरा नदीपात्रात दूषित पाणी मुळे लाखो माशांसह कुत्रेही मृत्युमुखी पाडत आहे. पुढील काळात मानवी जीवनाला धोका होऊ शकतो. याचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ बंदोबस्त पाटबंधारे विभागाने तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी करावा व लवकरात प्रश्न मार्गी लावावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल.

आप्पासाहेब जाधव, मा.सरपंच खुडसरगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या