Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकआदिवासींकडून मोहफुले, बिया खरेदीचा विचार : बनसोड

आदिवासींकडून मोहफुले, बिया खरेदीचा विचार : बनसोड

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यातील आदिवासी भागात ( Tribal Area in the Nashik District )असलेल्या शेतकर्‍यांकडून मोह फुले, मोह बिया खरेदी करण्याबाबतचा विचार सुरू आहे, असे आदिवासी विकास विभागाच्या व्यवस्थापक लीना बनसोड (Lina Bansod- Tribal Development Department)यांनी सांगितले. त्र्यंबकेश्वर येथील विविध कार्यकारी संस्थेमार्फत गुरुवारी एकाधिकार धान खरेदी केंद्राचे उद्घाटन बनसोड आणि आ. हिरामण खोसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

- Advertisement -

त्यावेळी बनसोड यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधताना बोलत होत्या. त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, इगतपुरी या तालुक्यात भात शेतीसह नागली, उडीद, वरई हे खरीप हंगामातील पिके घेणारा शेतकर्‍यांचा मोठा वर्ग आहे. शेतकर्‍यांना आपल्या उत्पन्नात तोटा होऊ नये, तसेच आदिवासी महामंडळाशी संलग्न असणार्‍या विविध कार्यकारी संस्थांनाही तोटा होऊ नये, यासाठी अधिकारी वर्ग, शेतकरी यांचा समन्वय, त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे, पारदर्शक कामावर नियंत्रण ठेवून वेळेत त्याची अंमलबजावणी करणे, यासाठी सर्वतोपरी उपाययोजना आखणे हे आपले सर्वांचे काम असल्याचे बनसोड यांनी सांगितले.

धान्य खरेदी करताना घ्यावी लागणारी काळजी तसेच, धान्य ओले-सुके ओळखण्यासाठी आर्द्रता मापक यंत्रही यावेळी कार्यान्वित करण्यात आले. आमदार खोसकर यांनी भातासह गहू, हरभरा, तूर, मसूर हे धान्यही एकाधिकार धान खरेदी केंद्रामार्फत खरेदी करण्याची गरज मांडली. तसे झाल्यास शेतकर्‍यांना योग्य भाव मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या