Friday, April 26, 2024
Homeराजकीयचरणजित यांनी घेतली पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ; पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन

चरणजित यांनी घेतली पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ; पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन

दिल्ली | Delhi

कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबमधील कॉंग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. त्यांच्यानंतर कॉंग्रेसने आता चरणजीत सिंह चन्नी यांची पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. सोमवारी त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल बीएल पुरोहित यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

- Advertisement -

चन्नी व्यतिरिक्त सुखजिंदर सिंह रंधावा आणि ओम प्रकाश सोनी यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित आहेत. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी चन्नी यांना शपथ घेतल्यानंतर भेटून शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंजाबचे नवे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांचे अभिनंदन केले. त्यांनी ट्विट करून चरणजीतसिंह चन्नीचे अभिनंदन केले.

कोण आहे चरणजीत सिंग चन्नी?

चन्नी हे दलित शीख (रामदासीय शीख) समुदायाशी निगडित आहे आणि अमरिंदर सरकारमध्ये तंत्रज्ञान शिक्षण मंत्री होते. ते रुपनगर जिल्ह्यातील चमकौर साहिब विधानसभा क्षेत्रातून आमदार आहे. २००७ मध्ये ते प्रथमच या मतदारसंघातून आमदार झाले आणि त्यानंतर त्यांनी सलग विजय नोंदविला. शिरोमणी अकाली दल-भाजप युतीच्या राजवटीत २०१५-१६ मध्ये ते विधानसभेतील विरोधी पक्षनेतेही होते.

दरम्यान, आगामी निवडणुकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील, या पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते सुनील जाखड यांनी आक्षेप घेत आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केलीय. ‘हरीश रावत यांचं हे वक्तव्य म्हणजे नव्या मुख्यमंत्र्यांचं अधिकार क्षेत्र कमी करण्यासारखं’ असल्याचं सुनील जाखड यांनी म्हटलंय. दुसरीकडे सुनील जाखड यांचा भाचा अजयवीर जाखड यांनी पंजाब शेतकरी आयोगाच्या पदाचा आपला राजीनामा सोपवला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या