Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरउदयपूर चिंतन शिबिराची अंमलबजावणी महाराष्ट्रातून- पटोले

उदयपूर चिंतन शिबिराची अंमलबजावणी महाराष्ट्रातून- पटोले

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

उदयपूर येथे झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय चिंतन शिबिरातील धोरणांची अंमलबजावणी करण्याकरता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने चिंतन शिबिर होत असून यामध्ये दोन पदांवर असलेले विविध पदाधिकारी एका पदाचा राजीनामा देणार असून एक व्यक्ती एक पद यांसह काँग्रेसचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

- Advertisement -

शिर्डी येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित नवसंकल्प शिबिरात माध्यमांशी ते बोलत होते. यावेळी समवेत विधिमंडळ पक्षनेते महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे विशाल मुत्तेमवार आदी उपस्थित होते.

याप्रसंगी नाना पटोले म्हणाले की, देशामध्ये सध्या हुकुमशाही राजवट सुरू आहे. देशाचे सार्वजनिक विविध उद्योग, सार्वजनिक मालमत्ता विकण्याचे काम केंद्र सरकारने सुरू केले आहे. किंबहुना केंद्रातील भाजपा सरकारने देश विकायला काढला आहे. याचबरोबर जातीयतेची तेढ निर्माण करून देशाचे सार्वभौमत्व धोक्यात आणले आहे. देशाची लोकशाही व सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याकरता काँग्रेस पक्ष प्रभावी काम करत असून असून ज्यावेळेस दिल्ली संकटात आली त्यावेळेस महाराष्ट्र मदतीला धावून गेला आहे.

त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून होणार्‍या नवसंकल्प शिबिरातून देशाचे सार्वभौमत्व आणि लोकशाही अधिक बळकट करत टिकवण्यासाठी प्रभावी नियोजन केले जाणार आहेत. या करीत आगामी काळात प्रत्येक जिल्हानिहाय एक दिवसीय चिंतन शिबीर होणार असून प्रत्येक जिल्ह्यातून 75 किलोमीटरची पदयात्रा ही काढली जाणार आहे. काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी,खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली उदयपूर येथे झालेल्या चिंतन शिबिरातील सर्व योजनांची अंमलबजावणी सह्याद्रीच्या कुशीत आणि साईबाबांच्या पवित्र भूमीत असल्या शिर्डीमध्ये शिबिरातून होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या