Thursday, April 25, 2024
HomeराजकीयMallikarjun Kharge: मोदी हे विषारी सापासारखे; मल्लिकार्जुन खर्गेंचं टोकाचं विधान

Mallikarjun Kharge: मोदी हे विषारी सापासारखे; मल्लिकार्जुन खर्गेंचं टोकाचं विधान

नवी दिल्ली | New Delhi

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे भाजप नेते आक्रमक झाले आहेत…

- Advertisement -

भाजपासमोर कर्नाटकमध्ये सत्ता राखण्याचे आव्हान असून दुसरीकडे काँग्रेस भाजपचा पराभव करत सत्तेत येण्याच्या प्रयत्नात आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सध्या दोन्ही पक्षाचे मोठे नेते कर्नाटकात प्रचारसभांचा धडाका लावत आहेत. मात्र यादरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) एका विषारी सापाप्रमाणे (poisonous snake) असल्याचे मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले आहेत. यानंतर भाजपचे नेते संतापले असून कॉंग्रेसला प्रत्युत्तर देत आहेत.

१ मे पासून बदलणार ‘हे’ नियम; ग्राहकांच्या खिशावर होणार परिणाम

मल्लिकार्जुन खर्गे यांनी कलबुर्गी येथे जनतेला संबोधित करताना आपल्या भाषणात म्हटले होते की, तुमच्या विचारसरणी आणि तत्त्वांच्या जोरावर या देशाला उद्ध्वस्त करण्यासाठी तुम्ही पुरेसे आहात. तुमची विचारधारा, तुमचा सिद्धांत अतिशय चुकीचा आहे, त्यामुळे देशाचा नाश होत आहे. तसेच मोदी हे विषारी सापाप्रमाणे आहेत. जर हे विष आहे की नाही असा विचार तुम्ही केलात आणि ते चाटले तर तुमचा मृत्यू होईल. तुम्हाला वाटेल हे विष आहे का? मोदी चांगले व्यक्ती आहेत, त्यांनी हे दिले आहे आणि आम्ही ते पाहून घेऊन. असा विचार करत तुम्ही ते चाटले तर मग तुम्ही पूर्ण झोपेत आहात,असे त्यांनी म्हटले.

Barsu Refinery : दिल्लीतून वारंवार विचारणा झाल्यानंतरच…; उध्दव ठाकरेंचा गौप्यस्फोट

तसेच मल्लिकार्जुन खर्गेंच्या विधानावर भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी टीका केली आहे. या विधानावरुन त्यांची हतबलता दिसत असून काँग्रेसच्या हातातून कर्नाटक सुटत असल्याचे समोर येत आहे आणि याची पक्षाला जाणीव आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या वक्तव्यानंतर स्पष्टीकरण देखील दिले आहे. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख केलेला नाही. मी भारतीय जनता पक्षाला साप म्हटले होते त्यांनी सांगितले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या