Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याकॉंग्रेस बिथरली; उद्यापासून भाजप कार्यालयासमोर 'माफी मांगो'

कॉंग्रेस बिथरली; उद्यापासून भाजप कार्यालयासमोर ‘माफी मांगो’

मुंबई | प्रतिनिधी Nashik

देशभरात करोना पसरवण्याचे (Covid Spread) काम महाराष्ट्र काँग्रेसने (maharashtra congress government) केल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) यांनी सोमवारी लोकसेभत (Loksabha) केले होते. त्यानंतर आज पुन्हा राज्यसभेत (Rajyasabha) मोदींनी कॉंग्रेसवर शरसंधान साधले. यामुळे बिथरलेल्या कॉंग्रेसने उद्यापासून राज्यभरात भाजप कार्यालयासमोर (BJP office) माफी मांगो आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे….

- Advertisement -

याबाबतची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress maharashtra president nana patole) यांनी दिली. देशभरातील आणि राज्यातील राजकारण चांगलेच तापलेले आहे. दरम्यान, मोदींच्या टीकेमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान झाल्याचे सांगत बुधवारपासून काँग्रेसतर्फे भाजपच्या प्रत्येक कार्यालयासमोर ‘माफी मांगो’ आंदोलन (Mafi Mango agitation) करण्यात येईल.

मोदींच्या टीकेनंतर एका आयोजित पत्रकार परिषदेत पटोले बोलत होते. भाजपच्या सर्व कार्यालयासमोर आम्ही उद्यापासून महाराष्ट्राची माफी मागावी यासाठी आंदोलन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे भाजप नेते आशिष शेलार (bjp leader ashish shelar) आक्रमक झाले असून अंगावर आले तर शिंगावर घेऊ असे म्हणत कॉंग्रेसच्या आंदोलनाला त्यांनी आव्हान दिले आहे. तसेच सुप्रिया सुळे (Supriya sule) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना टीका केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या