घरपट्टी न भरल्यास जप्ती

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिकेची (Nashik Municipal Corporation) घरपट्टी (house tax) मोठ्या प्रमाणावर थकीत असलेल्या शहरातील टॉप टेनमधील 406 मिळकतधारकांकडे 7.80 कोटी रुपयांची थकबाकी असल्याने महापालिकेने थकबाकीदारांना जप्तीची नोटीस (Notice of confiscation) पाठवली असून लवकरच त्यांच्या मिळकतींच्या लिलावाची कारवाई (Auction action) केली जाणार आहे. दरम्यान जप्तीची नोटीस प्राप्त होताच 66 मिळकतधारकांनी तत्परता दाखवत 47 लाखांची घरपट्टी भरली आहे.

नाशिक महापालिकेच्या उत्पन्नात जमेची बाब असणार्‍या घरपट्टीची दिवसेंदिवस थकबाकी (Arrears) वाढत चालली आहे. त्यामुळे महापालिकेच्या विविध विकास कामांच्या निधीवर (fund) त्याचा परिणाम होत आहे. वेळोवेळी विविध मोहिमा राबवून तसेच अभय योजना जाहीर करूनही मिळकतधारक घरपट्टी भरण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे आता शहरातील सर्वाधिक घरपट्टी थकीत असणार्‍या बड्या थकबाकीदारांना महापालिकेने नोटीस बजावली असून घरपट्टी भरत नसाल तर जप्तीची कारवाई राबविली जाईल असे बजावण्यात आलेल्या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

सध्या मिळकत धारकांकडे 311.19 कोटी इतकी रक्कम थकीत आहे. तर चालू वर्षात 139.55 कोटी रुपयांची थकबाकी (Arrears) आहे. त्यामुळे एकूण थकबाकीचा आकडा हा 450.74 कोटींवर पोहोचला आहे. थकबाकी पैकी 43.17 कोटी रुपयांची वसुली झालेली असून तर चालू वर्षातील 71.06 कोटी रुपयांची थकबाकी वसूल झालेली असून ही एकत्रित वसुलीची रक्कम 114.23 कोटी इतकी झाली आहे.

त्यामुळे आता उर्वरित घरपट्टीची (house tax) थकबाकी भरावी यासाठी पुन्हा महापालिकेने कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून थकबाकीदारांविरोधात जप्तीची कारवाई करण्याच्या नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. लवकरच बड्या थकबाकीदारांच्या विरोधात विभागीय अधिकार्‍यांकडून कारवाई करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. यंदाचे आर्थिक वर्ष दि. 31 मार्चपर्यंत तब्बल साडेचारशे कोटी रुपयांची थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट कर विभागावर असून मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी 21.13 कोटींच्या वाढीव वसुलीचे उद्दिष्ट वसुलीचे देण्यात आले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *