Sunday, May 5, 2024
Homeनगरपारनेर तालुक्यात करोना रुग्णांचे हाल

पारनेर तालुक्यात करोना रुग्णांचे हाल

सुपा (वार्ताहर) –

करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य शासनाने 15 एप्रिल रोजी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. प्रशासन उपाययोजना करत आहेत,

- Advertisement -

परंतु तो तोकड्या पडत असल्याने काही रुग्णालये सोडता रुग्णांच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक केली जात आहे. याबाबत मनसेचे तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांना निवेदन देऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.

शासकीय आरोग्य अधिकार्‍यांनी खाजगी हॉस्पिटल, डॉक्टर यांची तातडीने मिटींग घेऊन योग्य नागरिकांच्या कोव्हिडच्या उपचार पद्धतीसंदर्भात मार्गदर्शन सूचना करावी, करोनावर एचआरसिटी नुसार उपचार पध्दतीचा अवलंब करावा, पेशन्टच्या नातेवाईकांची होणारी पिळवणूक तत्काळ थांबवावी, रेमडेसिवीर इंजेक्शन नकली की ओरिजिनल हे चेक करूनच पेशंटला देण्यात यावे, डिपॉजिट न घेता उपचार चालू करावेत, खाजगी हॉस्पिटलमध्ये करोना वॉर्डमध्ये काम करणार्‍या सर्व स्टाफला स्वतंत्र रहाण्याची व्यवस्था करून सुविधा पुरविण्यात याव्यात, करोना लसीकरण करते वेळी लसीकरण करणार्‍या स्टाफला हॅन्ड ग्लोज वापर करण्यास सक्तीचे करावे, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

खासगी रुग्ण्यालयात डॉक्टर रेमडेसिवीर इंजेक्शन लिहून नातेवाईकाला घेऊन यायला सांगत आहेत. बाहेर जनता कर्फ्यू असून नातेवाईक उन्हात फिरत आहेत. कोणी पोलिसांनी अडवले तर पाया पडतात, रडतात, विणवण्या करत असून मेडिकल स्टोअरमध्ये औषधाचे पैसे देण्यासाठी नागरिकांकडे पैसे नाहीत. यामुळे शासकीय आरोग्य यंत्रणेने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या