Thursday, April 25, 2024
Homeनाशिक'माय वाॅटर बॅक' संकल्पना लोक चळवळ व्हावी

‘माय वाॅटर बॅक’ संकल्पना लोक चळवळ व्हावी

नाशिक । प्रतिनिधी

आपल्या पुढच्या पिढीला पाण्याच्या समस्येपासून वाचवायच असेल तर यापुढे पाण्याची बचत करणे गरजेचे अाहे.

- Advertisement -

“रेन वॉटर हार्वेस्टिंग” ही संकल्पना प्रत्येकाने राबविण्याची गरज आहे. ‘माय वाॅटर बॅक’ या उपक्रमाला लोक चळवळीचे स्वरुप प्राप्त व्हावे अशी अपेक्षा

नमामी गोदा फाउंडेशनचे उपाध्यक्ष व सुप्रसिद्ध अभिनेते चिन्मय उदगीरकर यांनी केले .

नमामी गोदा व मिट्टी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मखमलाबाद रोडवरील विद्यानगर येथील ” माय वॉटर बँक ” या उपक्रमाच्या पहिल्या शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी तो बोलत होता. तो म्हणाला भविष्यात कोरोना पेक्षाही आपल्यापुढे पाण्याची गंभीर समस्या निर्माण होणार आहे.

समृद्ध नाशिक मध्ये औद्योगिकरण वाढत आहे. नाशिक मध्येही पाण्याची पातळी कमी होत चालली असून जवळपास दोन सेंटीमीटरने भूजल पातळी कमी झाली आहे.

शहरीकरण मोठ्या प्रमाणात होत असल्याने भूजल साठा कमी होत चालला आहे . त्यामुळे पाण्याचे महत्व समजून घेत ते जपलं पाहिजे. आपल्याकडे पाणी मुबलक मिळत असल्याने त्याची किंमत कळत नाही हे दुर्दैव आहे. पूर्वी घरांमध्ये एसी चा वापर अगदी कमी प्रमाणात होत होता. पण आज थंड व नैसर्गिक वातावरण मिळत नसल्याने एसीच्या वापराच्या प्रमाणात वाढ होत चालली आहे.

ज्याप्रमाणे आपण पैशाची बचत बँकेत करतो त्याच प्रमाणे पाण्याची बचत करणे गरजेचे आहे . यासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे . आपल्या पुढच्या पिढीच भवितव्य घडवायचं असेल आणि पाण्याच्या समस्येपासून दूर रहायचं असेल तर पाण्याच्या बचतीसाठी चळवळ उभी करण्याची गरज आहे.

त्यासाठी ” रेन वॉटर हार्वेस्टिंग ” ही संकल्पना राबवायला पाहिजे असे आवाहन त्याने केले. यावेळी “माय वॉटर बँक” संकल्पनेची सुरुवात करणारे मयूर मोरे यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग ही पाणी बचतीची अगदी सोपी पद्धत असल्याचे सांगितले .

गोदा फाउंडेशन चे अध्यक्ष राजेश पंडित व किरण भालेराव यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी अभिनेत्री गायत्री सोहम, मंगला भास्कर आदी उपस्थित होते .

- Advertisment -

ताज्या बातम्या