Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रइन्फोसिस कंपनीतील संगणक अभियंत्याची आत्महत्या

इन्फोसिस कंपनीतील संगणक अभियंत्याची आत्महत्या

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारून संगणक अभियंता प्रसून कुमार झा (वय 28 , रा. लॉरेल सोसायटी, वाकड) याने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.28 ) दुपारी दोनच्या सुमारास वाकड येथे घडली. ते इन्फोसीस कंपनीमध्ये कामाला होते.

- Advertisement -

वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसून हे हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीत संगणक अभियंता म्हणून कामाला होते. ते मूळचे बिहार येथील असून मागील काही वर्षांपासून वाकड परिसरात राहत होते.

दुपारी दोन वाजताच्या सुमारास त्यांनी इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलवण्यात आला आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या