स्पर्धा परीक्षा आणि नोकर भरती एक एप्रिल नंतर करावी

पुणे-

मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी 8 मार्चपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू होत असून, महिनाअखेपर्यंत यासंदर्भातील चांगला वाईट निर्णय होण्याची शक्यता आहे.

आमचा कुठल्याही परीक्षा किंवा नोकरभरतीला विरोध नाही. परंतु, एक एप्रिलच्या आत या परीक्षा घेतल्या किंवा नोकरभरती केली तर मराठा समाजाच्या मुला-मुलींचे नुकसान होणार आहे. त्यामुळे त्यामुळे आघाडी सरकारने स्पर्धा परीक्षा व नोकरभरती पुढे ढकलावी आणि एक एप्रिल नंतर करावी अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मेटे बोलत होते. यावेळी शिवसंग्रामचे संघटनेचे प्रवक्ते तुषार काकडे आदी यावेळी उपस्थित होते.

मेटे म्हणाले, येत्या 8 ते 18 मार्च दरम्यान, मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी आहे. त्यामुळे सरकारने स्पर्धा परीक्षा आणि नोकरभरती पुढे एक एप्रिलपर्यंत पुढे ढकलावी. आमचा कुठल्याही परीक्षा, नोकरभरतीला विरोध नाही. पण, या परीक्षा एक एप्रिलनंतर घेण्यात याव्यात. एक एप्रिलच्या आत या परीक्षा घेतल्या तर मराठा समाजाच्या मुला-मुलींचे नुकसान होणार आहे. एक एप्रिलनंतर परीक्षा, नोकरभरती करण्यात यावी म्हणून अनेकवेळा सरकारला पत्रव्यवहार केला आहे, असेही त्यांनी सांगितले.

मराठा समाजाच्या मुला-मुलींच्या आयुष्याची राखरांगोळी होऊ नये म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री शरद पवार यांनी पुढाकार घ्यावा. अंतिम सुनावणीकरिता रणनिती ठरविण्यासाठी बैठक बोलवावी. त्यामध्ये 8 ते 18 मार्चदरम्यान होणाऱया सुनावणीसाठी रणनिती ठरविण्यात यावी. अनेक याचिकाकर्ते आहेत. त्यांचीही बैठक बोलविण्यात यावी.

मराठा समाजाचे मंत्रीच मराठा मुला-मुलींचे वैरी

आघाडी सरकारला मराठा समाजाशी काही देणेघेणे नाही. सरकारने फक्त मतांसाठी मराठा समाजाचा वापर केला. मराठा समाजाचे मंत्रीच मराठा मुला-मुलींचे वैरी झाले आहेत, कुऱ्हाडीचा दांडा आणि गोतास काळ असे म्हणत अशोक चव्हाणांना मराठा समाजाशी मुळीच देणेघेणे नाही, अशी टीका मेटे यांनी यावेळी मारला.

पूजा चव्हाण प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी

संजय राठोड यांनी घाणेरडे राजकारण करत आहेत, असे सांगितले. पण, गुन्हेगाराला कोणता जात, धर्म नसतो. तुम्ही निष्कलंक आहात तर 15 दिवस लपून का राहिला होतात. सरकारला त्यांना वाचवायचे आहे. या सरकारला नितिमत्ता राहिलेली नाही. याप्रकरणी पोलीस तपास हा संशयास्पद आहे. पोलिसांनी एकदाही चौकशी केली नाही. उलट त्यांची सरबराई करण्यातच पोलिस गुंग होते. पूजा चव्हाण या युवतीचा कशामुळे आणि कोणामुळे हत्या झाली की आत्महत्या झाली हे लोकांना महिती आहे त्यामुळे लोक सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. सर्व चित्र स्पष्ट असताना अशा मंडळींना संरक्षण का दिले जात आहे. उद्धव ठाकरे यांची अशी कुठली मजबूरी आहे ज्यामुळे ते राठोड यांना पाठीशी घालत आहे असा सवाल करीत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणीही मेटे यांनी केली.