Thursday, April 25, 2024
Homeनाशिकगावा-गावांत संवाद साधा : अ‍ॅड. पगार

गावा-गावांत संवाद साधा : अ‍ॅड. पगार

सटाणा । प्रतिनिधी | Satana

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) प्रत्येक पदाधिकार्‍याने महिन्याच्या पहिल्या शनिवारी स्वतःच्या गावाला जाऊन गावकर्‍यांची बैठक घेत सध्याच्या सामाजिक (social), आर्थिक (Financial) व राजकीय (political) परिस्थितीवर चर्चा करावी, गावकर्‍यांशी संवाद साधावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार (District President of NCP Adv. Ravindra Pagar) यांनी केले.

- Advertisement -

बागलाण विधानसभा मतदार संघाच्या (Baglan Assembly constituency) माजी आ. दीपिका चव्हाण (former mla dipika chavan) यांची राज्य महिला आयोगाच्या (State Women’s Commission) सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची आढावा बैठक (Review meeting) येथील राधाई मंगल कार्यालयात जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पगार यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील (jayant patil) यांच्या सुचनेनुसार प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी स्वतःच्या गावात जाऊन गावकर्‍यांची बैठक घेत पक्ष संघटन बळकट करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन अ‍ॅड. पगार यांनी केले.

आपण स्वत: येत्या शनिवारी (दि. 5) मूळ गाव असलेल्या बागलाण तालुक्यातील (Baglan taluka) उत्राणे येथे जाऊन दुपारी 1 वाजता गावकर्‍यांशी संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांनी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. यांना सभासद नोंदवून पक्ष सभासद नोंदणीचा शुभारंभ केला. महिलांच्या हक्कांसाठी व सुरक्षतेसाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करू, असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या सदस्या माजी आ. दिपिका चव्हाण यांनी सत्काराला उत्तर देतांना केले.

व्यासपिठावर माजी आ. संजय चव्हाण, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, सामजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष यशवंत शिरसाट, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव, युवती जिल्हाध्यक्षा किशोरी खैरनार, ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष विजय पवार, युवक तालुकाध्यक्ष सम्राट काकडे, शहराध्यक्ष सुमित वाघ, अमोल बच्छाव, समीर देवरे,

महिला तालुकाध्यक्षा रेखा शिंदे, सुरेखा बच्छाव, विद्यार्थी तालुकाध्यक्ष सुयोग अहिरे, शहराध्यक्ष सागर वाघ, सुरेश पवार, वसंत भामरे, नानाजी दळवी, गणेश पवार, नितीन भामरे, संदीप अहिरे, किरण पाटील, चारुदत्त खैरनार, महेश शेवाळे, मेघदीप सावंत, सुजित बिरारी, संजय पवार, जयवंत सोनवणे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या