Wednesday, April 24, 2024
Homeजळगावव्यापारी संकुले आजपासून होणार खुली

व्यापारी संकुले आजपासून होणार खुली

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

व्यापारी संकुले प्रथम 9 ते 7 उघडण्याचा शुभारभ बुधवार 5 रोजी होणार असल्याने मंगळवारी 4 रोजी शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर नागरिक घराबाहेर पडले होते. व्यापारी संकुले उघडण्याबाबत जी. आर. आयुक्तांनी नुकताच मंगळवारी काढला. यानुसार बुधवार पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. एक दिवसाआड व्यापारी संकुले खुली राहतील असे सर्वांनुमते ठरले.

- Advertisement -

नवीन नियम बुधवारपासून लागू होणारअसल्याने मंगळवारी कोणाचेच नियंत्रण गर्दीवर दिसून आले नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर भली मोठी गर्दी दिसून येत होती. वाहनाचीही गर्दी होती. इतर पुरक व्यवसाय, दुकाने सुरू असल्याने अनेक नागरिक रस्त्यावर उतरलेले दिसून येत होते. मात्र यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला दिसून येत होता. कोणाचे कोणावर नियंत्रण नसल्याचेच दिसून येत होते. दुकानदारांना 5 व्यक्तिपेक्षा अधिक व्यक्ती नको, सॅनिटायझेशन फवारणे, 6 फूट अंतर ठेवणे या बाबी बंधनकारक केल्या आहेत.

दाणा बाजारात अनेक वाहने उभी

सकाळी 11 ते 5 या वेळेत कोणतीच वाहने बाजाात उभे राहणार नाहीत असे जिल्हा प्रशासनाच्या मिटींगमध्ये ठरवण्यात आले होते. तसेच व्यापार्‍यांच्या बैठकीतही ठरले होते. मात्र आजही या वेळेत अनेक वाहने दाणा बाजारात उभी असल्याचे निदर्शनास आले. सकाळपासून एकच उत्साह बाजारात दिसून येत होता. परवानगी नसलेल्याही दुकानेही उघडी असलेली दिसून आली. बळीराम पेठ, सुभाष चौक, दाणा बाजार परिसरात नागरिकांसह महिलांचीही अधिक प्रमाणात गर्दी दिसून आली.

शहरातील बहुतेक वर्दळीची ठिकाणे पूर्वीसारखी गजबजत होती, सोमवारी कुणाला कुणाचेच बंधन नसल्याचे दिसून आले. तसेच दाणा बाजार, सुभाष चौक, घाणेकर चौक, शनिपेठ, नेहरु चौक, राजकमल टाकीज चौक, स्वातंत्र्य चौक, कोर्ट चौक, बळीरामपेठ, शनिपेठ आदी भागात हॉकर्स व इतर दुकानदारांसह नारिकांची मोठी गर्दी होती. काही नागरिक खरोखर कामानिमित्त रस्त्यावर उतरले होते मात्र बरेचसे नागरिक हे बाजारात मोटार सायकलवर विनाकारण फिरण्यास येत असल्याचे दिसून येत होते.

गेल्या 4 महिन्यापासून शहरातील सर्वच व्यापारी संकुले बंद असल्यामुळे तेव्हापासून दुकानदार, व्यवसायिक या ठिकाणी काम करणारे कर्मचारी अशा सर्वांचेच जगणे हे असह्य झाले होते. मोठे नुकसान व्यावसायिक, दुकानदारांसह कामगारानाही सोसावे लागले. कर्मचार्‍याचा रोजगार बुडत होता. अखेर बुधवारपासून प्रशासनोन लॉकडाउन खोलल्यानंतरही बरेच व्यावसायिक, दुकानेही धास्तावलेले दिसून आले. त्यामुळे त्यांनी पहिल्या दिवशी कामगारांची जुळवाजुळव करणे, दुकानांची साफसफाई करणे याकडे दुकानदारांनी लक्ष दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या