Saturday, April 27, 2024
Homeनगरपिकत नव्हती शेती, तेव्हा घेतली होती फाशी

पिकत नव्हती शेती, तेव्हा घेतली होती फाशी

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

‘पिकत नव्हती शेती तेंव्हा घेतली होती फाशी, अन् तुम्ही सारे दिल्लीत, आमची झाली काशी’. ‘आम्ही आडनावाचे शेतकरी रे घालुनी खादी चौकात आधी स्टेजवरी सभेसाठी रे,’ ‘ज्या दिवशी माझं गाव टाऊन झालं माणसाचं मार्केट किती डाऊन झालं,’ अशा एकापेक्षा एक सरस हास्य कवीतांनी पाथर्डीकर हसुन हसुन लोटपोट झालेच परंतु त्यातील वास्तवाचे भान देणार्‍या आशयाने अंतमुर्खही झाले.

- Advertisement -

यास कारण होते. शहरातील स्व.माधवराव निर्‍हाळी नाटयगृह येथे माजी आमदार स्व.राजीव राजळे यांच्या जयंती निमित्त आयोजीत हास्य कवी संमेलनाचे. या हास्य कवी संमेलाचा प्रारंभ चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे, आ. मोनिका राजळे व उपस्थितांच्या हस्ते झाला. यात कवी नारायण सुमंत यांनी ‘आम्ही आडनावाचे शेतकरी, कवयत्री लता येवले यांच्या ‘उरी हुंदका दाटतोय गोष्ट बापाची सांगतांना,’ कवी नारायण पुरी यांच्या ‘स्त्री म्हणजे शक्ती पुरुष म्हणजे सहनशक्ती,’ अनंत राउत यांच्या ‘मायबाप, तुकाराम धांडे यांच्या ‘साहेब,’ भारत दौंडकर यांच्या गोफ, अरूण पवार यांच्या आफु अशा एकापेक्षा एक कवीतांनी संमेलन उत्तरोत्तर रंगत गेले.

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे,तालुकाध्यक्ष माणिक खेडकर,नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके,गोकुळ दौंड,अमोल गर्जे,विष्णुपंत अकोलकर,सोमनाथ खेडकर,अजय रक्ताटे,पांडुरंग सोनटक्के,अ‍ॅड.प्रतिक खेडकर,बंडू पठाडे,सचिन वायकर यांच्यासह नगरसेवक प्रवीण राजगुरू,रमेश गोरे,बजरंग घोडके,अनिल बोरुडे,महेश बोरूडे,नामदेव लबडे,शारदा हंडाळ, मंगल कोकाटे, दुर्गा भगत,सुनिता बुचकुल उपस्थिती होते मान्यवरांचे स्वागत राजीव राजळे मित्रमंडळाच्या वतीने बंडू बोरुडे यांनी केले.प्रास्ताविक नगराध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे सूत्रसंचालन पाथर्डीचे हस्ये सम्राट राजीव सुरवसे यांनी तर आभार रमेश काटे यांनी मानले.

माजी आमदार स्व. राजीव राजळे सुसंस्कृत राजकारणी होते. त्यांचे न माझे मित्रत्वाचे सबंध होते. पाथर्डी शहरात सांस्कृति कार्यक्रमासाठी अद्यावत सभागृह असावे हे त्याचे स्वप्न आ. मोनिका राजळे यांनी पुर्ण केलं याचा आनंद वाटतो. जेथे सुसंस्कृत समाज असतो तेथेच असे व्यासपीठ असते.

– मकरंद अनासपुरे, चित्रपट अभिनेते

- Advertisment -

ताज्या बातम्या