राज्यात ३ मे नंतर झोन नुसार मोकळीक मिळणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई | प्रतिनिधी 

३ मे रोजी लॉकडाऊन संपणार आहे, करोना विषाणूचे रुग्ण दिवसागणिक वाढत चालले आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून ३ मे नंतर ठरवलेल्या झोननुसार मोकळीक दिली जाणार जाणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. महारष्ट्र दिनाचे औचित्य साधत आज राज्यातील जनतेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला संबोधित केले. यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, सगळ्यांनाच मोठा आर्थिक फटका बसणार आहे. अनेकांच्या नोकऱ्या जाणार आहेत असे नेहमी ऐकले जात आहे. मात्र, राज्यातील जनता वाचली पाहिजे. सर सलामत तो पगडी पचास या भावनेने विषाणूपासून बचाव होणे महत्वाचे आहे. राज्य सरकार सर्वोतपरी प्रयत्न करत आहे.

शेतकऱ्यांच्या कामांना कुठलीही अडचण येणार नाही अशी व्यवस्था केली आहे. हळूहळू ग्रीन झोन आणि ऑरेंज झोनमध्ये मोकळीक दिली जात आहे. येणाऱ्या काळात ज्या ठिकाणी रुग्ण संख्या नियंत्रणात आहेत तिथे अधिक मोकळीक दिली जाईल.

रेड झोन म्हणजे महा ज्वालामुखी आहे तिथे तूर्तास काहीही निर्णय घेतला जाणार नाही. आहे त्याच परिस्थितीत तिथे परिस्थिती राहील.  ऑरेंज झोन मध्ये हा ज्वालामुखी निद्रिस्त स्वरुपात आहे. तिथे काही प्रमाणात मोकळीक दिली जाईल. ग्रीन झोनमध्ये मात्र हा ज्वालामुखी उद्रेक करू शकत नाही. त्यामुळे तिथे सर्वाधिक मोकळीक राहील. मात्र, उद्रेक टाळण्यासाठी जिल्हाबंदी कायम राहील.

यासोबतच ज्यांना परराज्यात जावयाचे आहे त्यांना अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने जावे लागणार आहे. तसेच इतर राज्यात अडकलेल्या आपल्या राज्यातील नागरिकांनादेखील आणले जाणार आहे. वाहतूक व्यवस्था करून त्यांना परवानगीनिशी आणले जाईल.  राज्यातल्या राज्यात काही लोक पर्यटन तसेच कामानिमित्त अडकले आहेत त्यांनाही टप्प्याटप्प्याने आणले जाणार आहे. त्यांचीही जाण्या येण्याची सोय केली जाणार आहे असे ते म्हणाले.

प्रारंभी, महराष्ट्र दिनाच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. हुतात्मा स्मारकात वंदन केले. मुख्यमंत्री म्हणून वंदन करत असताना भावना सांगू शकत नाही अशा आहेत. ज्या कामगारांनी  एक मे हिरक महोत्सव धूमधडाक्यात साजरा करणार होतो मात्र करोना विषाणूमुळे सर्वांनाच तोंडावर मास्क घालून वंदन करावे लागले. २०१० चा सोहळा संयुक्त महाराष्ट्राला ५० वर्षे झाली होती. आपण तो प्रसंग असा साजरा केला होता तो संपूर्ण क्षण आठवणीत राहण्याजोगा आहे. शिवसेना प्रमुख होते, सर्व ज्येष्ठ नेते होते. लता मंगेशकर होत्या. लता दिदींनी याठिकाणी गीत गायले होते.

दिदींनी लाखो लोकांच्या सोबत ते गाणे गायले होते. गोरेगावचे जे प्रदर्शनाचे स्थळ होते तिथे रक्तदानाचा विश्वविक्रम केला होता. अवघ्या २४ तासांत २५ हजार नागरिकांनी रक्तदान केले होते. तसेच जसे बीकेसीमध्ये रुग्णालय उभे करतो अहोत तसेच रुग्णशय्या आपण या प्रदर्शनाच्या ग्राउंडवर उभारले जात आहे.

राज्यातील नागरिक खूप पाठीशी उभे आहेत. खूप मदत करत आहेत. तीन पर्यंत लॉकडाऊन आहे पुढे काय करणार असे अनेकजण विचारत आहेत. सर्किट ब्रेकर हि जी विषाणूची शृंखला आहे ती तोडणे म्हणून आपण लॉकडाऊन केले आहे. असे केले नसते तर रुग्ण नियंत्रणात राहिलेच नसते.

महाराष्ट्रातील प्रादुर्भाव अधिक नाही. आजही ७५-८० टक्के नागरिक सौम्य ते अतिसौम्य रुग्ण आहेत. मुंबई महापालिकेकडून कार्य युद्धपातळीवर तपासणी सुरु आहे. घरोघरी जाऊन महापालिकेने आजवर २ लाखांपेक्षा अधिक नागरिकांची तपसणी पल्स ऑक्सिमीटरने तपासणी केली आहे.

एव्हढी तपसणी केल्यानंतर २७२ नागरिक इतर दुर्धर आजाराशी संबंधित आहेत. अशा नागरिकांना त्वरित उपचारार्थ दाखल करण्यात आली असून उपचार केले जात आहेत.

कोव्हीड योद्धा उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.  मुंबई महापौर आणि कल्याण डोंबिवलीच्या महापौर यांनीदेखील रुग्णसेवा करण्याची तयारी दाखवली आहे. त्यादेखील कर्तव्य बजावण्यासाठी जात आहेत असे उद्धव ठाकरे म्हणाले. येत्या तीन तारखेनंतर झोननुसार काही प्रमाणात मोकळीक दिले जाण्याचे त्यांणीस सांगितल्याने राज्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *